मुंबई : अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी खासदार मोहन रावले यांचे शनिवारी सकाळी गोव्यात पहाटे 4 वाजता हृद्यविकाराच्य...
मुंबई : अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी खासदार मोहन रावले यांचे शनिवारी सकाळी गोव्यात पहाटे 4 वाजता हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. मोहन रावले हे वैयक्तिक कामासाठी गोव्यात गेले होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. रावले यांचे पार्थिव आज मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी आणले जाणार आहे.रावले हे आतापर्यंत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे पाच वेळा खासदार राहिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात असत. शिवसेनेतील बड्या नेत्यांपासून ते शिवसैनिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा दांडगा संपर्क होता. लालबाग परळमध्ये लहानाचे मोठे झालेले रावले हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे. तसेच लालबाग-परळ ब्रँड अशी त्यांची विशेष ओळख होती.