अंबाजोगाई : केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांनी आज भारत बंदची हाक दिली होती. या हाक...
अंबाजोगाई : केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांनी आज भारत बंदची हाक दिली होती.
या हाकेला अंबाजोगाईकरांनी ओ देत शंभर टक्के बंद पाळला.
सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, प्रहार संघटना यासह विविध शेतकरी संघटना आणि अन्य सामाजिक संघटनांसह कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर उतरून बंदची हाक देत होते. या बंदला अंबाजोगाईकरांनी शंभर टक्के प्रतिसाद देत आपआपले व्यवसाय बंद ठेवले.