बीड। प्रतिनिधीः- पोलीस कल्याण विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या विश्वासहार्य असलेल्या पोलीस पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी गर्...
बीड। प्रतिनिधीः-
पोलीस कल्याण विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या विश्वासहार्य असलेल्या पोलीस पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी गर्दी आहे. मात्र बीड शहरातील पोलीस मुख्यालयालगत असलेल्या पंपावर व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे नियमाची पायमल्ली होत आहे. यासंदर्भात दखल घेवून ग्राहकसेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
बीड शहरातील नगररोडवर असलेल्या पोलीस कल्याण पेट्रोल पंपावर गेल्या काही दिवसापासून पोलीस व्यवस्थापनातील कर्मचार्यांचे दुर्लक्ष होत आहे. येथील पोलीस कर्मचारी पूर्ण वेळ उपस्थित राहत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. पोलीस विभागाच्या मानव संसाधन विभागाचे पोलीस निरिक्षक पोलीस पंप, मुख्यालयातील दुकाने, कल्याणाच्या योजनेकडे ढुंकूनही पाहत नाहीत. वरिष्ठ अधिकार्यांच्या नियत्रणाची गरज व्यक्त होत आहे. पोलीस पंपावरील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर जनरेटर सुरू होवूनही 20 ते 25 मिनिटे पेट्रोलपंप सुरळीत सुरू होत नाही. जनरेटरच्या दुरूस्ती अभावी तांत्रिक अडचणीमुळे सदर अडचण येत आहे. खाजगी मालकीच्या पंपापेक्षा पोलीस पंपाविषयी विश्वासहार्यता असल्याने सातत्याने याठिकाणी मोठी गर्दीची लाईन असते. परंतु काही महाभाग ओळखीच्या नावाखाली लाईन तोडतात. त्यामुळे रांगेतील ग्राहकावर अन्याय होतो. सध्या कोविडच्या परिस्थितीमध्ये काही कर्मचारी मास्क वापरत नाहीत. तर अनेकवेळा पेट्रोल टाकण्याचे काम सुरू असतांना तंबाखू खाणारे तेथेच थुंकतात. पंप परिसरात स्वच्छतेचला महत्व द्यायला हवे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी जनकल्याणाच्या उपक्रमाकडे सजगतेने पाहण्याची गरज आहे.
--------------