नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)चे नेतृत्त्व आणखी सक्षम झाले पाहिजे, असे म्हणून शरद पवार यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक करणार्या खास...
नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)चे नेतृत्त्व आणखी सक्षम झाले पाहिजे, असे म्हणून शरद पवार यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक करणार्या खासदार संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले. शिवसेना यूपीएची सदस्य नाही, त्यांनी यूपीएचे सदस्य व्हावे आणि मग अंतर्गत चर्चा करावी, असा चिमटा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काढला. राऊत पत्रकार म्हणून बोललेले आहेत, असे थोरात म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याआधीच पंतप्रधानपदाची संधी मिळायला हवी होती; पण त्यांना पंतप्रधान होण्यापासून अडवण्यात आले, असे वक्तव्य राऊत यांनी याआधीही केले होते. युपीए अध्यक्ष होण्याची शरद पवारांची इच्छा नसेल असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. युपीएचे अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपद नव्हे, सर्वांत मोठ्या पक्षाचा नेताच यूपीएचा अध्यक्ष होतो, याची आठवण चिदंबरम् यांनी करून दिली.
पवार यांंना यूपीए अध्यक्ष बनवण्याच्या मागणीवर काँग्रेसने मौन सोडले. काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे यूपीएचा अध्यक्ष काँग्रेसचा राहिला, याची आठवण त्यांनी करून दिली.