फलटण / प्रतिनिधी : सातारा रोडवर गांजाची चोरटी वाहतूक करणार्या दुचाकी स्वारास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे सुमारे 2 किलो 25 ग्र...
फलटण / प्रतिनिधी : सातारा रोडवर गांजाची चोरटी वाहतूक करणार्या दुचाकी स्वारास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे सुमारे 2 किलो 25 ग्रॅम गांजा सापडला आहे. गांजा व दुचाकी जप्त करून, दुचाकीस्वारास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपीस न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने संशयितास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पो. कॉ. संदिप लोंढे, पो. का. विजय दुधाळकर, होमगार्ड जाधव व नाचन असे नाकाबंदी कराना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एक इसम संशयीतरित्या होंडा ड्रीम मोटार सायकल वरुन, फलटण बाजूकडे आला. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याच्या पाठीवरील सॅकची पाहणी केली असता, सॅकमधील प्लॅस्टीकच्या पिशवीत गांजा आढळुन आला. पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या सुचनेनुसार सपोनि सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर यांनी गांजा जप्त केला. सिकंदर इस्माईल बागवान (वय 41, रा. बुधवार पेठ, तेली गल्ली, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) याच्याविरोधात बेकायदेशीर गांजा कब्जात ठेवुन वाहतुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईमध्ये पोलिसांनी 2 किलो 25 ग्रॅम गांजा, मोबाईल संच व दुचाकी असा सुमारे 79 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या सुचनेनुसार सपोनि सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर, कॉन्स्टेबल संदिप लोंढे, विजय दुधाळकर, भैय्या ठाकुर, नितिन चतुरे, तांबे, होमगार्ड जाधव व नाचक यांनी केली.