पुणे : रानगव्यांनंतर पुण्यातील उत्तमनगर भागात हरणांचं कळप निदर्शनास आलं आहे. उत्तमनगर भागात एनडीएच्या तुटलेल्या सीमाभिंतीतून हरणांचं कळप ...
पुणे : रानगव्यांनंतर पुण्यातील उत्तमनगर भागात हरणांचं कळप निदर्शनास आलं आहे. उत्तमनगर भागात एनडीएच्या तुटलेल्या सीमाभिंतीतून हरणांचं कळप बाहेर लोकवस्तीत आलं.
शिवणेतील इंगळे कॉलनी येथील आशिर्वाद टेरेस या सोसायटीला लागूनच एनडीएची सीमाभिंत आहे. ही भिंत अनेक ठिकाणी जीर्ण झाली असून, काही ठिकाणी मोठी फट पडली आहे. त्यामुळे या सोसायटीत अनेकदा एखादे हरीण किंवा त्यांचे कळप बाहेर येताना अनेकदा निदर्शनास आले आहेत.
संजय दोडके यांच्या माध्यमातून वन विभागाला याची माहिती दिली. यानंतर वन कर्मचाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरात रानगवा आढळून आला होता.
----------------------------------