$type=ticker$snippet=hide$cate=0

रयत संस्थेतील बोगस शिक्षक भरतीप्रक्रिया वादाच्या भोवर्‍यात

जिल्ह्यातील मॅनेजिंग कौन्सिलचे काही सदस्य या षडयंत्रात सहभागी  कर्मवीर अण्णांच्या तत्वांना मूठमाती देत पदाधिकार्‍यांनी मांडला बाजार  अहमदनगर...

जिल्ह्यातील मॅनेजिंग कौन्सिलचे काही सदस्य या षडयंत्रात सहभागी 

कर्मवीर अण्णांच्या तत्वांना मूठमाती देत पदाधिकार्‍यांनी मांडला बाजार 

अहमदनगर/विशेष प्रतिनिधी : शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी अविरतपणे मेहनत घेत, पायाला भिंगरी बांधून गावोगावी भटकंती करुन, सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे यासाठी कर्मवारी भाऊराव पाटील यांनी प्रयत्न केले. मात्र त्याच रयत शिक्षण संस्थेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली असून, ही वाळवी संस्थेला पोखरत असल्याचे दिसून येत आहे. प्राध्यापक आणि शिक्षक भरती प्रक्रियेत अहमदनगर जिल्ह्यातील काही पदाधिकार्‍यांनी आपले उखळ पांढरे केले आहे. 

कोट्यावधी रुपयांची माया गोळा करणारे रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे, अरविंद बुरुंगले ही दोन चेहरे सध्या चर्चेत आली असली तरी त्या अगोदर असणारे सचिवांनीही सत्तेचा गैरवापर करुन ज्ञानमंदिरात सरस्वतीच्या जोडीला लक्ष्मीचा सहवास कसा नांदतो हे दाखवून दिल आहे. गरीब रयतेच्या झोपडीतही ज्ञानाचा दिवा लागावा, या अदम्य इच्छेपोटी कर्मवीर भाऊराव अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या तत्वाची गरीबांसाठी बांधिलकी दाखवली. वेळप्रसंगी रयतसाठी लक्षीबाईचे दागिने विकून रयतेचा वटवृक्ष बहरला. मात्र अलिकडच्या दशकात रयत शिक्षण संस्थेमधील बदल्या आणि शिक्षक भरतीप्रक्रीया दुर्दैवाने चरण्याचे कुरण ठरत आहे. गतकाळात रयत संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपुलकीचा होता. स्व.माजी खासदार शंकरराव काळे यांचेकडे जोपर्यंत रयतची सुत्रे होती. तोपर्यंत रयतचा नावलौकिक होता. त्यांनी अनेकांना एक रुपया न घेता रयतमध्ये नोकर्‍या दिल्या. संस्थेसाठी कारखान्याच्या माध्यमातून भरीव योगदान दिले. वृद्धापकाळात स्व. काळेंकडे संस्थेचे नामधारी उपाध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर काळेंना संस्था पदाधिकारी फारसे जुमानत नव्हते. तेव्हापासून संस्थेवर कुणाचा वचक न राहिल्याने जिल्ह्यातील काही मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्यही या नोकरभरतीच्या षडयंत्रात सामिल असूनही गुणवत्तेवर भरतीप्रक्रीया पार पाडत असल्याचा खोटा आव आणत होती. रयत शिक्षण संस्था दरवर्षी शिक्षण सेवकासह इतर पदांची जाहिरात देत असे. त्या फॉर्म विक्रीतून सन-2008-09 साली 10 लाख 92 हजार 920 रुपये कमावलेले असले तरी दरवर्षीच हा गोरखधंदा सुरुच होता. गुणवत्ताधारक प्राध्यापकांना डावलून गुणवत्तारहीत शिक्षकांच्या नियुक्तीसाठी संस्थेत मोठे रॅकेट चालत असल्याची चर्चाही रंगायची. मात्र या भ्रष्ट कारभाराला शिक्षण क्षेत्रातील शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालकांनी उमेदवारांनी तक्रारी करुनही संस्था आणि बोगस निवड झालेल्या उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन पदांना मान्यता दिलेल्या आहे. खाजगी शाळा, माध्य व उच्च माध्य शाळांतील शिक्षणसेवक नियुक्ती करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2000 चा शासननिर्णय अस्तित्वात आला. प्रत्यक्षात त्यात निवडप्रक्रिया विशद करण्यात आली नव्हती. त्यामुळे 20 मे 2004 च्या शासन परिपत्रकान्वये डीएड, बीएड परीक्षेत सर्वाधिक गुण असलेल्या उमेदवाराला नियुक्ती देणे बंधनकारक होते. तसेच उच्च न्यायालय, मुंबई यांनी पिटीशन नं. 10360/2011 मध्ये  6 जानेवारी 2012 रोजी पदवीच्या गुणांना प्राधान्य देऊन निवड करण्याचे आदेश होते. तरी देखील रयत शिक्षण संस्थेने संबंधित शासकीय अधिकारी वर्गाने या आदेशाला  मुजोरीने आजपर्यंत मुठमातीच दिलेली आहे. जर हे शासननिर्णय विचारात घेतले असते तर रयतच्या पदाधिकार्‍यांची दुकानदारी बंद होण्याची शक्यता दाट होती. त्यात संस्थेच्या या बोगस निवडप्रक्रियेला  पाठीशी घालणारे शिक्षणाधिकारी व विभागीय उपसंचालक कालबाह्य झालेल्या सन 1981 मधील नियम क्र. 9 नुसार माध्यमिक शाळा संहिता मधील विभाग क्र. 2 शर्ती नियम 67:1, 67:2 च्या आड लपून शाळा व्यवस्थापानाशी संधान असल्याचे यापुर्वी वारंवार सिद्ध केलेले आहे. क्रमशः


अहमदनगर, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यातील ते पदाधिकारी कोण 

रयतमध्ये शिक्षक भरतीप्रक्रीयेत तेथील सचिव आणि त्यांच्या दलालांमार्फत मोठ्या प्रमाणात माया जमविली आणि आपल्या नातेवाईक आणि चाटुगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांची वर्णी लावुन गुणवत्ताधारक लोकांना डावललेले आहे.त्यातील भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांच्या अगोदर सचिव पद उपभोगलेल्यांनी रयतचा भोग माया कमविण्यासाठीच केलेला असुन, कर्मवीर अण्णांचे तत्व गुंडाळून या संस्थेचे बाजारीकरण मांडणार्‍या या महाभागांचे दलाल अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यात जास्तच असून आता त्यांची झाडाझडती घेण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मनेजिंग कौन्सिलने पुढे येऊन गुणवत्तेला आणि रयतला कलंक लावणार्‍यांची आतातरी गय करु नये.

Name

] ब्रेकिंग,862,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,5,Latest News,5780,letest News,599,Loksabha-2019,164,Maharashtra,211,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,156,satara.,4,solapur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10381,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,710,देश,4457,नाशिक,805,पुणे,753,बीड,1438,बुलडाणा,29,बुलढाणा,878,ब्रेकिंग,16545,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13791,महाराष्ट्र सातारा,42,मुंबई,3740,विदेश,655,संपादकी,2,संपादकीय,1560,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: रयत संस्थेतील बोगस शिक्षक भरतीप्रक्रिया वादाच्या भोवर्‍यात
रयत संस्थेतील बोगस शिक्षक भरतीप्रक्रिया वादाच्या भोवर्‍यात
https://socialimages.sakalmediagroup.com/yinbuzz-prod/s3fs-public/news-story/cover-images/3Rayat_Logo.jpg?JLW0sCTGEt2SKR3ZYpBamPJsk0YZy4DL
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_776.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_776.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content