$type=ticker$snippet=hide$cate=0

रेशन गहु घोटाळाप्रकरणी पोलिसांना समन्स

न्यायालयात हजर राहण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश  पारनेर/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील वडनेर बु. येथील रेशनचा गहु काळ्या बाजारात विकल्याबाब...


न्यायालयात हजर राहण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश 

पारनेर/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील वडनेर बु. येथील रेशनचा गहु काळ्या बाजारात विकल्याबाबतची तक्रार तत्कालीन पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दडपल्याप्रकरणी, औरंगाबाद खंडपीठाने पारनेर पोलिस निरीक्षकांना स्वतः न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश गेल्या 23 जानेवरीला दिलेला होता. परंतु तेव्हा ते हजर राहीले नव्हते. नंतर पोलिस उपअधिक्षकांनीही  या प्रकरणातील पारनेरचे तत्कालीन निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांच्यासह काही पोलिस कर्मचारी यांची चौकशी करून जबाब नोंदवले होते. न्यायालयाने त्यांना पुन्हा येत्या 5 जानेवारीला तपासाच्या सर्व कागदपत्रांसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत  वडनेर येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय मोहन पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

    या घटनेची सविस्तर माहिती अशी की, 7 जानेवारी 2018 रात्री वडनेर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत स्वस्त धान्य वितरण  करणारे भागा खंडू बाबर हे रेशनचा गहू काळ्या बाजारात विकताना दत्तात्रय पवार यांनी पकडले व त्यांनी निघोज पोलिसांना कळवले. पोलिसांनी तक्रारदाराची तक्रार नोंदवून, मुद्देमालासह गहु विकत घेणार्‍या व त्यांच्याकडे  रेशनकार्ड नसणार्‍या दोन ग्राहकांना त्याब्यात घेवून त्यांचे जबाब नोंदवले. व पारनेर तहसिलदारांना पकडलेला गहू रेशनचा असल्याची खात्री करण्यास सांगितले. तहसिलदारांनी हा  पकडलेला  गहू रेशनचा आहे, किंवा नाही हे सांगता येत नाही असा अहवाल दिला. त्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे व उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी पकडलेला  मुद्देमाल सोडून देत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. मुद्देमाल ताब्यात घेतल्यावेळी नोंदवलेल्या जबाबात हा गहु रेशनचाच असल्याचे स्पष्ट म्हणणे त्या ग्राहकांचे असल्याने याबाबत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी तक्रारदार पवार यांनी वारंवार वरिष्ठांकडे केली. परंतु त्याची दखल कोणीही न घेतल्याने त्यांनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली. यापूर्वीच्या सुनावणीवेळी न्यायालयाने पारनेर पोलिस निरीक्षकांना न्यालयात या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु चौकशी अहवाल व प्रत्यक्ष हकीगत आणि पुरावे पाहता हा गहु सार्वजनिक वितरणासाठीचाच असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदले. त्यामुळे प्रत्यक्ष घटना व चौकशी अहवाल यात मोठी विसंगती असल्याने पोलिस निरीक्षकांनी तपासाच्या सर्व कागदपत्रांसह न्यायालयात स्वतः हजर  राहण्याचे  आदेश दिले होते. परंतु पोलिस न्यायालयात हजर राहत नाहीत.

  या प्रकरणात रेशनचा गहु गरजूंना न देता तो काळ्या बाजारात विकल्यामुळे जीवनावश्यक  वस्तु अपहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, या संबंधिताचे प्रकरण दडपणार्‍या पोलिस अधिकारी यांची चौकशी होवून त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर  कारवाई व्हावी अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केलेली आहे. या बाबतची पुढील सुनावणी 5 जानेवारीला होणार आहे. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्याय. एम.जी. शेवळीकर यांच्या खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांचे वतीने अ‍ॅड. दत्तात्रय मरकड बाजु मांडत आहे.

---------------------------------------

तक्रारदार म्हणून पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल कधीच घेतली नाही. आता न्यायालयालाही तपासी अधिकारी वारंवार टाळत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढत चालले आहे.

दत्तात्रय पवार वडनेर ता, पारनेर,तक्रारदार

Name

] ब्रेकिंग,859,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5746,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,193,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,33,satara,132,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10291,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,701,देश,4421,नाशिक,803,पुणे,729,बीड,1435,बुलडाणा,24,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16330,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13558,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3676,विदेश,650,संपादकीय,1542,सातारा,3198,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: रेशन गहु घोटाळाप्रकरणी पोलिसांना समन्स
रेशन गहु घोटाळाप्रकरणी पोलिसांना समन्स
https://i0.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/12/ration-card-1.jpg?resize=750%2C430&ssl=1
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_778.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_778.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content