$type=ticker$snippet=hide$cate=0

कराड जनता बँक दिवाळखोरीत; रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द करण्याची कारवाई

सातारा जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात खळबळ; ठेवीदारांमध्ये घबराटीचे वातावरण कराड / प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात नावाजलेली कराड जनता सहकारी बँके...



सातारा जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात खळबळ; ठेवीदारांमध्ये घबराटीचे वातावरण

कराड / प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात नावाजलेली कराड जनता सहकारी बँकेचा बँकींग परवाना रिझर्व्ह बँकेने आज रद्द केला. त्याबाबतचे आदेश आज येथे प्राप्त झाल्याने ठेवीदार, सभासदामध्ये खळबळ उडाली. रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर करत बँक अवसायनत गेल्याचे जाहीर केले आहे. त्या बँकेवर उपनिबंधक मनोहर माळी यांची अवसायानिक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बँकेचे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे 29 शाखा व 32 हजार सभासद आहेत.

उपनिबंधक मनोहर माळी यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, कराड जनता सहकारी बँकेचा बँकींग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. त्याचे आदेश काल रात्री उशिरा पारीत झाले आहेत. सकाळी ते मिळाले आहेत. त्याबाबत बँकेतही त्याची स्थळप्रत लावण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार बँकेत 5 लाखाआतील ठेवीदारांचे पैसे परत केले जाणार आहेत. त्याला किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बँकेच्या दोन विस्तारीत कक्षासह 29 शाखा आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे त्या संस्था विस्तारलेल्या आहेत. त्या सगळ्याच संस्थाचे कामकाज बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर आता सहकार आयुक्तांनी कराड जनता बँक अवसायानात गेल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी अवसायानिक म्हणून माझीच नेमणूक केली आहे.

कराड जनता बँकेवर नोव्हेंबर 2017 मध्ये रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आले. त्यानंतर 6 ऑगस्ट 2019 रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक झाली. त्यानंतरच्या कालावधीत संचालक मंडळाच्या अनेक गोष्टी बाहेर आल्या. निर्बंधाच्या कालवधीत बँकेचे सभासद आर. जी. पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवर पोलीस तपासाचे आदेश झाले. त्यानुसार शहर पोलिसात जनता बॅकेच्या संचालक मंडळासह काही अधिकार्‍यांवर तब्बल 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदविला होता. तोही गुन्हा पोलीस तपासावर आहे. सन 2017 ते 2019 या निर्बंधाच्या काळात बँकेने केलेले काम नियमबाह्य होती. रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आल्यानंतर बँकेचा बँकींग परवाना रद्द करण्याचा आदेश बँकेने दिला आहे. 

------------------------------------

बँकेच्या संचालक व व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे बँकेचा परवाना रद्द होण्याची वेळ आली आहे. पाच लाखाच्या आतील ठेवीदारांना पैसे मिळणार असल्याचे समजते. त्यापेक्षा मोठी ठेव ठेवलेल्या ठेवीदारांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही सभासदांचे पैसे मिळण्यासाठी अनेकदा आंदोलन केले. मात्र, बँकेच्या व्यवस्थापनाने सभासद ठेवीदारांच्यामध्ये दोन गट पाडण्याचे काम केले. आजच्या निर्णयामुळे खरी परिस्थिती समोर आली. 

श्री. विकास पाटील

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 

कराड तालुका अध्यक्ष 

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5550,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,3,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9984,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,661,देश,4154,नाशिक,776,पुणे,597,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15384,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12483,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3446,विदेश,637,संपादकीय,1467,सातारा,3157,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कराड जनता बँक दिवाळखोरीत; रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द करण्याची कारवाई
कराड जनता बँक दिवाळखोरीत; रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द करण्याची कारवाई
https://images2.sakalmediagroup.com/eSakal-Prod/s3fs-public/styles/generic_md_75/public/news-story/cover-images/0karad_20bank.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_788.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_788.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content