अहमदनगर/विशेष प्रतिनिधी गेले पंधरा दिवस राज्यभरात विशेषतः पञकारांच्या विश्वात खळबळ माजवून एकूणच माध्यमकर्मींना शरमेने मान खाली घालण्यास मजब...
गेले पंधरा दिवस राज्यभरात विशेषतः पञकारांच्या विश्वात खळबळ माजवून एकूणच माध्यमकर्मींना शरमेने मान खाली घालण्यास मजबूर करणाऱ्या बाळ बोठेच्या कृष्ण कृत्यांची मालिका रोज एक नवीन वळण घेत असतांना त्याचे वृत्तांकन आहे तसे करणे ही माध्यमांची जबाबदारी आहे.आपले कर्तव्य वृत्तसंहीतेच्या चौकटीत राहून केले जात असेल आणि त्यासाठी आवश्यक त्या संदर्भाचा उहापोह करणे क्रमप्राप्त असेल तर अशा वृत्तांकन शैलीला मिडिया ट्रायल संबोधणे न्यायिक ठरेल का? असा एक नवा पेच माध्यमांसमोर उभा ठाकला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील रेखा जरे हत्याकांडात पश्चिम महाराष्ट्रात दबदबा असलेल्या आणि एकूणच राज्यातील राजकारणात प्रभाव असलेल्या कुटूंबाशी नातं सांगणाऱ्या सकाळ या वृत्तपञाच्या अहमदनगर आवृत्तीत गेली अनेक वर्ष कार्यकारी संपादक म्हणून काम केलेल्या बाळ बोठे या कथित प्रतिष्ठीत पञकाराचा थेट हात निष्पन्न झाल्यानंतर राज्यातील माध्यमक्षेञातच नव्हे तर राजकीय सामाजिक क्षेञातही खळबळजनक आणि तितक्याच संतप्त भावना उमटल्या.अर्थात बाळ बोठे सारख्या एका व्हाईट काॕलर समाजकंटकाकडून सामाजिक गुन्हे पहिल्यांदाच घडले असे नाही.यापुर्वीही त्याच्या पराक्रमाची गाथा अहमदनगर शहरात गेल्या दोन तीन वर्षापासून चर्चेत होतीच.माञ एका प्रथितयश प्रतिष्ठीत वृत्तपञात कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत असाल्याने त्याच्या अनेक चुका नव्हे तर गंभीर गुन्ह्यांवर समाजातील जाणकारांसह यंञणेही पांघरूण घातले.माञ शिशुपालाप्रमाणे शंभर पापांनी घडा भरल्यानंतर विनाशकाली विपरीत बुध्दी जागली.थेट हत्याकांडातच हात रक्ताने माखला.पोलीसांकडे त्याच्याविषयी सबळ पुरावे उपलब्ध झाले आणि मागे गाडलेल्या पापांचे मुडदे खोदले जाऊ लागले.या गुन्ह्यात बाळ बोठे किती आणि कसा गुन्हेगार आहे याविषयी पोलीस यंञणा तपास करील,तपासाच्या आधारे प्राप्त पुराव्यांची शहनिशा करून सन्माननीय न्यायालय योग्य तो निर्णयही करील.तो आपला प्रांत नाहीच.माञ अशा एखाद्या प्रकरणात खरा गुन्हेगार शोधायचा असेल तर संशयीतांच्या अवतीभवती घडलेल्या घडामोडी विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते.या प्रकरणातही माध्यमांनी या चौकटीत वृत्तांकन केले असेल तर ते टिकेचे लक्ष्य ठरणे माध्यम स्वातंञ्यांच्या वाटेवरचे गतिरोधक ठरू शकतील.अर्थात या प्रकरणाची पार्श्वभूमी आणि म्हणूनच गांभिर्य वेगळे असल्यामुळे माध्यमांना अधिक जबाबदारीने वृत्तांकन करणे आवश्यक ठरले.आजपर्यंत जवळपास सर्वच माध्यमांनी ही जबाबदारी नेटाने पार पाडल्याचे दिसते,तरीही या वृत्तांकनाला मिडीया ट्रायल संबोधणे माध्यमांचे हक्क नाकारण्यासारखे होईल.
आमची हे वृत्तांकन मिडीया ट्रायलच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्नही काही बोठे समर्थक करतील.त्यांची यत्किंचीतही तमा नाही.चिंता आहे ती सन्मानीय न्यायालयाला मुळ मुद्यावरून बाजूला नेण्याचा प्रयत्न म्हणून संशयितांची बाजू मांडणाऱ्या कायदे तज्ञांनी बाळ बोठे प्रकरणाची मिडीया ट्रायल सुरू झाल्याचा बनाव करण्याची.अन्य प्रकरणात विशेषतः राष्ट्रीय पातळीवर विविध प्रकरणात अषाले नसलेल्या मुद्यांना चर्चेत आणून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा जाणिव प्रयत्नांशी या प्रकरणाची तुलना होणार नाही इतकेच.या साऱ्या प्रकरणात न्यायव्यवस्थेवर कुठल्याही प्रकारची टिपण्णी करण्याचा हेतू नाही तरीही सन्माननीय न्यायव्यवस्थेची माफी मागून माध्यमांची गळचेपी होणार नाही स्वातंञ्य अबाधित राहील ,एव्हढीच माफक अपेक्षा.
रेखा जरे हत्याकांड आणि अहमदनगर शहरात चर्चेत असलेल्या हनी ट्रॕप प्रकरणाचा घरोबा असल्याची खुली चर्चा सुरू आहे.या प्रकरणाची शहरात चर्चा सुरू झाल्यानंतर कथित मामी भोवती सारे फास आवळले जाऊ लागले.नेमक्या वेळी या हत्याकांड प्रकरणात मुख्य संशयीत बाळ बोठे संपादक असलेल्या वृत्तपञात हानी ट्रॕपविषयी मालीका सुरू झाली.अनेक रथी महारथींच्या प्रतिष्ठेवर लेखनीचे वार झाले.तेंव्ही ती मिडीया ट्रायर नव्हती का?
रेखा जरे हत्याकांडात मुख्य सुञधार बाळ बोठे याच्यासोबत माध्यम क्षेञातील काही कथित गुन्हे वार्ताहर सहभागी असल्याचा पोलीसांना संशय आहे.बाळ बोठेच खबरी म्हणून काम करीत असतांना हनी ट्रॕपमध्येही या वार्ताहराचे भरीव योगदान असल्याची चर्चा आहे.अधिकाऱ्यांना ,राजकीय प्रातिष्ठीतांना या जाळ्यात अडकवून आपले उखळ पांढरे करण्यात या बोरू बहाद्दराचा हातखांडा असल्याचे सांगितले जाते,विशेष म्हणजे महिलांच्या हतबलतेचा फायदा घेण्यात अधिक स्वारस्य दाखवणाऱ्या या गुन्हे शोध वार्ताहराने एका महिलेलाही हनी ट्रॕपच्या जाळ्यात अडकवण्याचा आयशस्वी खटाटोप केल्याचीही चर्चा आहे.ही महिला बधत नाही म्हणून महिलेच्या मुलावर काही पोलीसांना हाताशी धरून विविध प्रकारचे खोटे गुन्हेही दाखल करून घेतले.संबंधित महिलेचे दैव बलवत्तर म्हणून ही महिला या जाळ्यात आडकली नाही.ही बाबही पोलीसांनी तपासकामी विचारात घ्यावी आशी शहरात चर्चा आहे.