दैनिक लोकमंथनमध्ये वाचा विशेष संपादकीय रेखा जरे यांच्या मारेकऱ्यांच्या शोधाचं आव्हान रेखाताई जरे यांची हत्या आणि काही प्रश्न जरे खून प्र...
दैनिक लोकमंथनमध्ये वाचा विशेष संपादकीय
रेखा जरे यांच्या मारेकऱ्यांच्या शोधाचं आव्हान
रेखाताई जरे यांची हत्या आणि काही प्रश्न
जरे खून प्रकरणाचे मुळ काय ?
क्षुल्लक कारणावरुन होऊ शकते का हत्या ?
रेखा जरे नक्की कुणाच्या वाटेतील अडसर बनल्या होत्या?
अहमदनगर जिल्ह्यातील हनी ट्रॅपचा काय संबध!
जरे यांच्या खुनाचा उलगडा होणार का ?
----------------------------------------------------------
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या उमदे व्यक्तीमत्व रेखा जरे यांची हत्या दुचाकीला कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून झाली यावर विश्वास कुणी आणि कसा ठेवायचा? हयात असतांना मनुष्य प्राण्याने केलेल्या चांगल्या वाईट कर्माची चर्चा त्याच्या पाठीमागे करायची नसते हा भारतीय संस्कारांनी घालून दिलेला संकेत आहे. मात्र अशा भयानक गुन्ह्याची खर्या अर्थाने उकल व्हावी असे प्रामाणिकपणे वाटत असेल, नराधम मारेकर्यांच्या मुसक्या बांधायच्या असतील, अशा खुनी हल्ल्यांमागील मास्टर माईंडच्या नाड्या आवळायच्या असतील तर बळी गेलेल्या व्यक्तीमत्वाच्या हयातीतील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. कुणी कुणाचा बळी घेणे ना मानवतेला शोभणारे आहे ना कायदा अशा कृत्यांना परवानगी देतो, म्हणूनच कुठल्याही हल्यांचा परिपूर्ण तपास करायचा असेल तर चहुअंगाने विचार करायला हवा. छोट्यातली छोटी गोष्टही हल्लेखोरांचा माग काढण्यास सहाय्यभूत ठरू शकते, ही बाब जरे खुन प्रकरणातही दुर्लक्षीत करता येणार नाही.
उद्याच्या विशेष संपादकीय मध्ये दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ. अशोक सोनावणे यांची या प्रकरणावरील दखल नक्की वाचा !