बीड । प्रतिनिधीः- ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका साठ वर्षीय शेतकर्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना तालुक्यातील कोळवाडी शिवारात आज ...
बीड । प्रतिनिधीः-
ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका साठ वर्षीय शेतकर्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना तालुक्यातील कोळवाडी शिवारात आज दुपारी घडली असून या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. हे रानडुक्कर जवळच असलेल्या वनीकरण विभागात येत असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. मसू तुकाराम जाधव (वय 60, रा. कोळवाडी) हे आपल्या शेतातील ज्वारीला पाणी देण्यासाठी आज दुपारी 12 वाजता शेतात गेले होते. त्या वेळी त्यांच्यावर अचानक रानडुकराने हल्ला केला असून त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तत्काळ नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. कोळवाडी परिसरात असलेल्या वनीकरणातून हे रानडुक्कर येत असल्याने याचा परिसरातील शेतकर्यांना मोठा त्रास होत आहे. पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.