कराड / प्रतिनिधी ः एक...दोन...तीन मिनिटांत कोणताही वाद, आरोप, प्रत्यारोप ना करत एकच विषय एकमताने मंजूर करत कराड नगरपालिकेची विशेष सभा अधिक...
कराड / प्रतिनिधी ः एक...दोन...तीन मिनिटांत कोणताही वाद, आरोप, प्रत्यारोप ना करत एकच विषय एकमताने मंजूर करत कराड नगरपालिकेची विशेष सभा अधिकारी-पदाधिकार्यांनी आटोपती घेतली. पालिकेच्या इतिहासातील पहिलीच सभा इतक्या कमी वेळात होण्याची नोंद आजच्या सभेने नोंदवली. या विशेष सभेचे विशेष म्हणजे विकास कामांच्या निधीचे वाटप समसमान करण्याच्या मुद्द्यावर एकमत झाल्याने पदाधिकार्यांसह अधिकारी हस्य कल्लोळ करत बाहेर पडले.
कराड नगरपालिकेची सभा म्हणजे एकतर वेळेवर होईल यांची कधीच खात्री नसते. दुसरे सुरू झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप हे तर ठरलेले असतात. परंतू शुक्रवार दि. 11 रोजीची सभा हस्याच्या कारंज्यात सुरू झाली. केवळ तीनच मिनिटांत सर्व विषय मंजूर करून संपली. या सभेत 19 कोटी 35 लाख रूपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्याक्ष रोहीणी शिंदे होत्या. यावेळी विषयांचे वाचन नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी केले तर अनुमोदन सौरभ पाटील यांनी दिले. त्यानंतर सर्वच नगरसेवकांनी मंजूर म्हणत सभा संपविण्यात आली.