पेठ बीडकरांनी काय पाप केले? जे तुम्हाला निवडून दिले बीड। प्रतिनिधीः- मागील दिड वर्षापासून ईदगाह रोड ते नाळवंडी नाका रस्त्याची दयनीय अवस्था झ...
पेठ बीडकरांनी काय पाप केले? जे तुम्हाला निवडून दिले
बीड। प्रतिनिधीः-
मागील दिड वर्षापासून ईदगाह रोड ते नाळवंडी नाका रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून याकडे कोणत्याच राजकीय पक्षाचे लक्ष नसल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांची तारांबळ होत आहे. यातच जिल्हा रुग्णालय आदित्य कृषी महाविद्यालयात स्थलांतर करण्यात आले असून गंभीर रुग्णांना दररोज या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत असल्याने अतिगंभीर रुग्ण तसेच गर्भवती स्त्रियांना जिवाचा धोका निर्माण होवू शकतो. पेठ बीड भागातील रस्ते विविध योजना अंतर्गत जागोजागी खोदकाम करून ठेवलेले आहे. शहरातून ग्रामीण भागाला जोडणारा नाळवंडी नाका रस्ता मागील दिड वर्षांपासून खोदकाम करून ठेवलेला आहे. जागोजागी पाण्याचे लिकेज असून रस्त्यांमध्ये खड्डेच खड्डे पडले आहेत. चालताना पादचार्यांना त्रास होत असून वाहन चालवणे मुश्किल झाले आहे.
भागातील राजकीय पुढार्यांत मुख्य स्त्याविषयी अनास्था असल्याने रस्त्याचे काम प्रलंबीत झाले आहे. शहरातील विविध रस्ते चकाचक होत असताना पेठ बीड भागातील रस्ते मात्र जिर्ण अवस्थेत आहेत. पेठ बीडकरांनी काय पाप केले? जे तुम्हाला निवडून दिले असा संतप्त सवाल सत्ताधार्यांना नागरिक विचारू लागले आहेत. जिल्हा रुग्णालयाचा विचार करता तरी हा रस्ता तात्काळ दुरुस्ती करावा अशी मागणीही मोठ्या प्रमाणात पेठ बीड भागातून होत आहे.