सिंदखेडराजा /प्रतिनिधि सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील महार रेजिमेंट जवान प्रदीप साहेबराव मांदळे हे कर्तव्य बजावतांना बर्फ अंग...
सिंदखेडराजा /प्रतिनिधि
सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील महार रेजिमेंट जवान प्रदीप साहेबराव मांदळे हे कर्तव्य बजावतांना बर्फ अंगावर पडून शहीद झाले.त्यांच्यावर शासकीय इतमामात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. सहा दिवसापासून शहीद जवानांच्या अंतीम दर्शनासाठी प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो मातृतिर्थ बुलडाण जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी अश्रू ढाळत अखेरची सलामी दिली. विर जवान अमर रहे,शहीद प्रदीप साहेबराव मांदळे अमर रहे,भारत माता की जय अशा घोषणा देत आपल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रास अखेरचा निरोप देण्यात आला.
दिनांक 15 ला कर्तव्यावर असताना जम्मू काश्मीरमधील द्रास टायगर हिल भागात अंगावर बर्फाचा ढीग पडून त्यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या तिशीतच देशासाठी या वीर जवानांचे बलिदान झाले.
वीर जवान शहीद प्रदीप मांदळे हे 2009 रोजी महार रेजिमेंट मध्ये दाखल झाले होते प्रदीप चा एक भाऊ सुनील हे जालना येथे कृषी सहाय्यक आहे तर लहान भाऊ विशाल हा कलकत्ता येथे सैन्या मध्ये आहे.
प्रदीप शहीद झाल्याची बातमी येताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली दरम्यान त्याचे पार्थिव खराब वातावरणामुळे येण्यास विलंब झाला आहे शनिवार ला शहीद वीर जवान प्रदिप यांचे पार्थिव विमानाने औरंगाबादला आणले त्यानंतर आज रावीवरला सकाळी 10,.45 वाजता त्यांचे पार्थिव गाडीने त्यांचे मूळ गाव पळसखेड चक्का येथे आणण्यात आले शहीद प्रदीपचे पार्थिव त्याच्या राहत्या घरी आणला त्यावेळेस त्याची पत्नी कांचन आई शिवनंदा मुले जयदीप भाऊ यांच्या घरातील सर्वांनी एकच आक्रोश केला ते बघून सर्वांचे डोळे पाणावले.त्यानंतर गावातून एका सजवलेल्या गाडीतून शहीद प्रदीपची अंत्ययात्रा काढून पार्थिव गावा शेजारी असलेल्या शेतात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले या वीर जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी रस्त्यात पुढे रांगोळी काढण्यात आल्या होत्या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.प्रत्येकांनी घरासमोरुनच शहीद जवानांस अखेरची सलामी दिली.यावेळी प्रत्येकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. प्रदीप चा स्वभाव चांगला मनमिळाऊ असल्याने आणि गावात सर्वांशी सलोख्याचे संबंध असल्याने आणि नुकताच सुट्टी वरून येऊन सर्वांना भेटून पुन्हा ड्युटीवर गेला होता असे काही विपरीत होईल असे कोणालाच वाटत नसताना अचानकच तो शहीद झाल्याची बातमी आली त्यामुळे या वीर शहीद जवानांच्या आठवणीने वयोवृद्ध, तरुण,मित्रमंडळीने अखेरचा निरोप देताना हंबरडा फोडला.अमर रहे अमर रहे, शहीद प्रदीप मांदळे अमर रहे च्या जयघोषाने पळसखेड चक्का परिसर दुमदुमून गेला होता.
शहीद प्रदीप यांना अखेरचा निरोप घेण्यासाठी सैन्य दलाच्या जवानासह पोलिस पथकाने मानवंदना दिली त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी या वीर जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले त्यानंतर जिल्हाधिकारी रामास्वामी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया औरंगाबाद 304 मेडियम रेजिमेंटचे मेजर मनिष कुमार तिवारी विभागीय सैनिक कल्याण अधिकारी मेजर सईदा फिरदोस उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार सुनील सावंत वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव आदींसह अनेकांनी या वीर पुत्रास पुष्पचक्र अर्पण केले त्यानंतर बौद्ध पद्धतीने भंते शिवली बोधी थेरो भन्ते यस धम्मसेवक यांनी त्रिशरण पंचशील घेतले त्यानंतर औरंगाबाद येथील सैन्य दलाने आणि बुलडाणा पोलीस दलाने या वीर सुपुत्राला अंतिम गार्ड ऑफ ऑनर्स देण्यात आला शासकीय इतमामात वीर जवान प्रदीप मांदळे वर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी वीर जवान प्रदीप मांदळे यांचा मोठा मुलगा जयदीप याने शहीद जवान प्रदीप यांचे बंधू संदीप आणि विशाल याचा मदतीने पित्यास मुखाग्नी दिला. यावेळी वीर जवान प्रदीप यांची पत्नी कांचन आई शिवनंदा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी नगराध्यक्ष सतीश तायडे समाज कल्याण सभापती राम राठोड गटविकास अधिकारी कांबळे नायब तहसीलदार प्रवीण लटके सैनिक अधिकारी पडघान विनोद वाघ मनोज कायंदे पंडितराव खंदारे, वंचित चे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव सविता मुंडे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन काकडे बबनराव सोसे गजानन मुंडे सभापती जगन मामा सहाने प्रभाकर ताठे गुंडा भाई पळसखेड चक्का चे ग्रापं सरपंच आणि माजी सरपंच सदस्य माजी सरपंच तसेच जिल्हाभरातील माजी सैनिक यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
पुष्पवृष्टी आणि रांगोळीने रस्ते सजले
गावचे सुपुत्र सिमेवर कर्तव्य बजावतांना शहीद झाले. त्या वीर जवानाच्या स्वागतासाठी गावातील अंतर्गत रस्ते देशभक्ती पर सुविचार,चित्रांने रंगले होते.कोरोनांच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टेंसिंगचा अवलंब करून महिला,तरुणी,व युवकांनी अंत्ययात्रेच्या वेळी शहीद जवानांची जागोजागी आरती करुन पुष्पवृष्टी केली. यावेळी अनेकांचे डोळ्यातुन अश्रू वाहत होते.
माझा मुलगा देशासाठी अमर झाला...माझा मुलगा गेल्याचे मला दु:ख आहे.पण देशासाठी तो शहीद झाल्याचा अभिमान असून तो अमर झाला.पोटचा गोळा होता, म्हातारपणांची माझी काठी गेली.पण तो देशाच्या कामी आल्याचा सार्थ अभिमान असल्याचे आई शिवनंदा यांनी सांगितले वीरपत्नी कांचन ने पतीच्या सांगितलेला आठवणीने साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.