$type=ticker$snippet=hide$cate=0

कांदा लागवडीला वेग परतीचा पाऊस , अवकाळीशी दोन हात करून शेतकरी सज्ज

                    नाशिक:कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा पाऊस, अवकाळी वातावरणातील सततचे बदल अशा अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत, ऑक...

  

 


               नाशिक:कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा पाऊस, अवकाळी वातावरणातील सततचे बदल अशा अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत, ऑक्टोबर महिन्यात टाकलेली रोप ७० टक्क्यापेक्षा जास्त खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात बियाणे टाकल्यामुळे यंदा लागवडी उशिरापर्यंत सुरु राहणार असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त केले जात आहे. बागलाणच्या पश्चिम पट्यातील वटार, चौंधाणे, विरगावं, वनोली,डोंगरेज, कंधाणे, विंचुरे आदी गावांमध्ये कांदा लागवडीला जोर धरला आहे, दरवर्षी प्रमाणे यंदाही  बळीराजा शेतात राबतांना दिसतआहे.

    जिल्ह्यातील आदिवासी भागातील मंजूर वर्ग ऊस तोडणीसाठी बाहेर गावी गेला आहे.परिसरात मंजूर टंचाई निर्माण झाली आहे.प्रत्येक गावात इतर भागातून मंजूर आणावे लागत आहेत.तेही रोजंदारी वर न येता कंत्राट पद्धतीने काम करण्याची अट घालीत आहेत.  तसेचे मजुरीचे दर ही वाढले आहेत. कांदा लागवडीसाठी २५०ते ३०० रुपये रोज असा दर झाला आहे.बियाणे,खते आदीमुळे  कांदा उत्पादनासाठी  खर्चातही वाढ झाली आहे.

    गेल्या काही वर्षांत चांगला बाजारभाव असल्यामुळे इतर पिकापेक्षा चार महिन्यात  कांदा पिकांची लागवड वाढली आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपे बियाणे मिळेल त्या भावाने विकत घेतली आहेत.  ढगाळ हवामानामुळे औषधफवारणी मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात ; त्याचबरोबर बाजार मिळतो कि नाही या विचाराने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागतो. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.सध्या एक एकर लागवडीसाठी १३ते १५ हजार रुपये मजूरवर्ग घेतात. एक एकरासाठी यंदा बियाण्यांचे बाजारभाव बघता एक लाख रुपयांच्या आसपास खर्च कांदा काढणीपर्यंत होणार आहे.एवढा खर्च करून पिक निघेल आणि बाजारभाव मिळेल याची शाश्वती नसतानाही शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळला आहे.


यंदा १५ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार कांदा लागवड

यंदा अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे ७० टक्के  कांदा रोप खराब झाली आहेत.

शेतकऱ्यांनी एक-दोन नाही चार-पाच वेळा कांद्याची बियाणे टाकली दर आठवड्याला फवारणी केली. तरीही रोप चांगले नसल्यामुळे कांदा लागवडीत घट होणार असून सध्या कांद्याच्या रोपाला सोन्याचा भाव मिळत आहे. तरीही रोप  मिळत नाही.

 यंदा अजून सुद्धा शेतकरी बियाणे टाकत असून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यत रोपे टाकले जाण्याची शक्‍यता  आहे.परिणामी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांदा लागवडी सुरूच राहतील असे सांगितले जात आहे.


बियाण्यांच्या भावामुळे उत्पादन खर्चात होणार दुप्पट वाढ

    परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रोपवाटिकांचे नुकसान झाले. परिमाणी शेतकऱ्यांना चार ते पाच वेळेस रोप टाकावी लागली. यामुळे बाजारत कांदा बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सामान्य कंपनीचे देखील बियाणे बाजारात ५ ते ६ हजार रुपये प्रतिकिलो  या दराने खरेदी केल्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ होणार आहे.

_

मागील काही महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव विचारात घेता.परतीच्या पावसामुळे रब्बी उन्हाळी कांदा लागवडीच्या रोपवाटिकावर विपरीत परिमाण झाला आहे.कांदा बियाण्यांची मागणी वाढली आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता मागील वर्षाच्या तुलनेत कांदा लागवडीच्या क्षेत्रात फारसी घट होणार नाही. रोपे लावतांना शेतकऱ्यांनी एम ४५ ,वीस ग्राम, बाविस्टीन 10 ग्राम,क्लोरोपार्रिफॉस्  20 मीली.दहा लिटर पाण्यामध्ये पंधरा मिनिटं कांद्याची रोपे बुडून ठेवायची.नंतर वाळवून ती लागवड करायची हे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आव्हान आहे.

      - सुधाकर पवार,तालुका कृषी अधिकरी, सटाणा

------------------------

यंदा परतीच्या पावसामुळे रोपांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे त्यातच ५ ते ६ हजार रुपये किलो भावाने शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतले त्याला दर आठवड्याला फवारणी त्यामुळे यंदा कांद्याच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. पैसे देऊन मजूर मिळत नाही, मजुरीचे दामही दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे शेती कसने अवघड झाली आहे.

       -संतोष बागुल,  कांदा उत्पादक.

फोटो नावे:- वटार येथे कांदा लागवड करताना मजुर


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5573,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,14,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10029,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,666,देश,4191,नाशिक,779,पुणे,619,बीड,1425,बुलडाणा,3,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15511,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12620,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3472,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3168,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कांदा लागवडीला वेग परतीचा पाऊस , अवकाळीशी दोन हात करून शेतकरी सज्ज
कांदा लागवडीला वेग परतीचा पाऊस , अवकाळीशी दोन हात करून शेतकरी सज्ज
https://socialimages.sakalmediagroup.com/agrowon-prod/s3fs-public/styles/generic_md_75/public/news-story/cover-images/2onion_web_8_1.JPG
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_813.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_813.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content