$type=ticker$snippet=hide$cate=0

उद्योग विस्तारासाठी दावा केलेला भूखंड त्रयस्थास हस्तांतरित करण्याचा एमआयडीसीचा डाव उद्योजक नंदकुमार कर्डक यांचा आरोप

नशिक । वाजवी दावा असताना अंबड औद्योगिक परिसरातील भूखंड त्रयस्थ व्यक्तीला हस्तांतरित करण्याचे कारस्थान एमआयडीसी नाशिक कार्यालयाकडून करण्यात य...


नशिक । वाजवी दावा असताना अंबड औद्योगिक परिसरातील भूखंड त्रयस्थ व्यक्तीला हस्तांतरित करण्याचे कारस्थान एमआयडीसी नाशिक कार्यालयाकडून करण्यात येत असल्याचा आरोप उद्योजक  नंदकुमार कर्डक यांनी केला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आपण याआधीच सादर केला असल्याने सदर भूखंड आपणास उद्योग विस्तारासाठी हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणीही कर्डक यांनी केली आहे. एमआयडीसी प्रशासनाचा लालफितीचा कारभार निषेधार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केले.


आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत कर्डक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची बाजू मांडली. यासंदर्भात ते म्हणाले, अंबड औद्योगिक परिसरातील प्लॉट क्र. पी. 27 (ए. एम. 41 पूर्वीचा हेलीपॅड) हा विस्तारित उद्योगासाठी मिळावा, यासाठी आपण रितसर एमआयडीसी कार्यालय, सातपूर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्लॉटवर होऊ घातलेला हेलीपॅडचा प्रस्ताव एका रात्रीत बासनात गुंडाळण्यात आल्याचे एमआयडीसी कार्यालयाकडून आपणास सांगण्यात आले. ही बाब लक्षात घेता तसेच उद्योग विस्ताराची गरज लक्षात घेतासंबंधित भूखंड आपणास अग्रहक्काने मिळणे आवश्यक आहे. यासाठी आपण 2008 पासून पाठपुरावा करीत आहोत. वस्तुत: आपण अनुसूचित जाती (एससी) जमातीमध्ये मोडत असून नियमानुसार या वर्गासह अनुसूचित जमाती (एसटी) साठी 20 टक्के भूखंडांचे आरक्षण आहे. तथापि, एमआयडीसीकडे विचारणा केली असता त्यांनी हे आरक्षण निरंक दाखवल्याचा दावा कर्डक यांनी केला आहे.


 या पार्श्वभूमीवर आपण हा भूखंड प्राप्त करण्यासाठी पात्र असताना तो त्रयस्थ व्यक्तीला हस्तांतरित करण्याचा घाट एमआयडीसी नाशिक कार्यालयाकडून घातला जात असल्याची आपली माहिती आहे. ही बाब धक्कादायक आणि अन्यायकारक असल्याचेही कर्डक यांनी नमूद केले. तसा व्यवहार करण्यात आल्यास तो शासकीय धोरणाला हरताळ फासणारा आणि बेकायदेशीर होईल. शिवाय, त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होणार आहे. यासंदर्भात, एमआयडीसी कार्यालयाने योग्य पाऊल न उचलल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई निर्णयकर्त्यांवर राहील, असा इशाराही कर्डक यांनी दिला आहे.


     हेलीपॅड प्रस्ताव रात्रीतून गुंडाळल्याचे गमक काय?


दरम्यान,  नशिक शहर मुंबई आणि पुणे शहरांनंतर सर्वाधिक द्रुतगतीने विकसित होणारे शहर असताना त्यामध्ये जलद दळणवळण सुविधेची भर पडल्यास विकासाचे ते एक पाऊल समजले जावे. प्रस्तावित  हेलीपॅड त्याच अनुषंगाने उभारण्यात येणार होते. तथापि, हेलीपॅड  संकल्पना एका रात्रीत गुंडाळण्यात आली. ही बाब आश्चर्यकारक व तितकीच धक्कादायक  


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10358,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,709,देश,4453,नाशिक,805,पुणे,750,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16506,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13749,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3728,विदेश,652,संपादकी,1,संपादकीय,1557,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: उद्योग विस्तारासाठी दावा केलेला भूखंड त्रयस्थास हस्तांतरित करण्याचा एमआयडीसीचा डाव उद्योजक नंदकुमार कर्डक यांचा आरोप
उद्योग विस्तारासाठी दावा केलेला भूखंड त्रयस्थास हस्तांतरित करण्याचा एमआयडीसीचा डाव उद्योजक नंदकुमार कर्डक यांचा आरोप
https://static.toiimg.com/photo/msid-61816088/61816088.jpg?994249
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_814.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_814.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content