१५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी गावकी भावकीच्या राजकारणाला तालुक्यात वेग पारनेर/प्रतिनिधी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचा कार्...
१५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी
गावकी भावकीच्या राजकारणाला तालुक्यात वेग
पारनेर/प्रतिनिधी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील होत असलेल्या ८८ ग्रामपंचायत निवडणूक निवडणुकीचा कार्यक्रम १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे तर १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाकडे गाव पातळीवरून लक्ष देऊन असणाऱ्या इच्छुक उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका घोषित केल्या आहेत. पारनेर तालुक्यात ८८ ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. त्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे. यामध्ये १५ डिसेंबर रोजी तहसीलदार निवडणुकांची नोटीस प्रसिद्ध करतील २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे मागवण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी ४ जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्रे मागे ४ जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहेत तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
१५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. अशाप्रकारे निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यामुळे तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची तसेच मतदारांची प्रतीक्षा संपली आहे. अनेक दिवसापासून कोरोना मुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती. मात्र १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होऊन १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मुदतीत संपून त्या ठिकाणी प्रशासन सध्या काम पाहत होते. तालुक्यातील ८८ गावातील इच्छुक उमेदवार गेल्या काही दिवसापासून आपल्या उमेदवारीबाबत चाचपणी करत होते. त्या दृष्टीने अनेक जण कामाला लागले होते. कोरोना काळामध्ये सामाजिक कामांमध्ये काहींनी वाहून घेतले होते. त्यामुळे या सर्वांची आता प्रतीक्षा संपली आहे.