राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी कोल्हापुरातील व्हर्च्युअल रॅलीत संबोधित करताना राज्याचे ग्रामविकास ...
राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी कोल्हापुरातील व्हर्च्युअल रॅलीत संबोधित करताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे भावनाविवश झाले.
विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीतील आपल्या विजयावर पवार यांना झालेल्या आनंदाची आठवण सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.२००९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आली होती.
त्यानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती, की आज मला सगळ्यात जास्त आनंद झाला आहे, कारण सत्ता जरी आली असली तरी माझा हसन मुश्रीफ नावाचा अल्पसंख्याक कार्यकर्ता निवडून आला. यापेक्षा दुसरा आनंद नाही,' असे म्हणताच हसन मुश्रीफ यांना व्यासपीठावर अश्रू अनावर झाले.
शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शाहू सांस्कृतिक मंदिर, शाहू मार्केट यार्ड येथे व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले होते. मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी शिरवळ,
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, आदी उपस्थित होते. वेबसाईटचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर विभागनिहाय मंत्री व ज्येष्ठ नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. बीडहून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ठाण्यातून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नागपूरहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.