$type=ticker$snippet=hide$cate=0

खासदार संजय राऊत यांच्या पत्नीचे इडीलाच पत्र .....!

मुंबई/प्रतिनिधी :  पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे इडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नो...



मुंबई/प्रतिनिधी : 

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे इडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे. दि. 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी त्यांना आता कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यावर आता वर्षा राऊत यांनी ईडीला पत्र लिहून मुदतवाढ मागितल्याचं समोर आले आहे. 

पीएमसी बँकेत बनावट खात्यांद्वारे एका विकासकाला शेकडो कोटी रुपये कर्ज दिल्याची बाब 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी आरबीआयने सप्टेंबर 2019 मध्ये त्या व्यवहारावर निर्बंध घातले होते. आता हे निर्बंध मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. पीएमसी बँकला बुडवण्यात जी 44 मुख्य खाती होती, त्यापैकी 10 खाती एचडीआयएलची होती.


काय आहे प्रकरण?

वर्षा राऊतांना आलेली ईडीची नोटीस ही पीएमसी बँकेतील 55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी आहे. यासंबंधी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँक खात्यामधून काही आर्थिक व्यवहार झाले होते. हे सर्व प्रकरण एचडीआयएल या कंपनीशी संबंधित असल्याचा संशय ईडीला आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं एचडीआयएलच्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती.

वाधवान कुटुंबाने या बॅंकेकडून हजारो कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं आणि त्याची परतफेड केली नाही. या वाधवा कुटुंबाच्या जवळचे असणारे प्रवीण राऊत हे संजय राऊताच्या खास मित्रांपैकी एक असल्याचं सांगण्यात येतंय. प्रवीण राऊतांची पत्नी माधुरी यांच्या अकाउंटवरुन 55 लाख रुपये संजय राऊतांच्या पत्नीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैसा का ट्रान्सफर करण्यात आला याची माहिती ईडीला हवी आहे. यासाठी ईडीने त्यांना नोटीस पोठवली असल्याचं समजतंय.

संजय राऊतांनी 2016 साली राज्यसभा खासदारपदाच्या निवडणुकीवेळी जे शपथ पत्र जाहीर केलं होतं त्यात या व्यवहाराचा उल्लेख सापडतोय. अलिबागच्या किहिम बीचवर राऊत परिवाराने एक संपत्ती खरेदी केली असल्याचं समजतंय. किहिमच्या समुद्र किनाऱ्यापासून 600 मीटर अंतरावर बिगर शेती असणारे 10 प्लॉट खरेदी करण्यात आले होते. या जमिनीची मालकी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावे आहे असं सांगितलं जातंय.

Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5734,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,187,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,124,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10277,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,700,देश,4419,नाशिक,802,पुणे,724,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16302,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13521,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3663,विदेश,650,संपादकीय,1540,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: खासदार संजय राऊत यांच्या पत्नीचे इडीलाच पत्र .....!
खासदार संजय राऊत यांच्या पत्नीचे इडीलाच पत्र .....!
https://images.bhaskarassets.com/web2images/5483/2020/12/27/raut_1609076297.gif
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_8215.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_8215.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content