$type=ticker$snippet=hide$cate=0

अग्रलेख : तमिळी राजकारणातील बेरीज

तमिळनाडूच्या राजकारणात आतापर्यंत चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचाच प्रभाव होता. एमजीआर, करुणानिधी आणि जयललिता यांनी चित्रपट आणि राजकीय क्षेत्र...


तमिळनाडूच्या राजकारणात आतापर्यंत चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचाच प्रभाव होता. एमजीआर, करुणानिधी आणि जयललिता यांनी चित्रपट आणि राजकीय क्षेत्र एकाचवेळी गाजविले. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर तमिळी राजकारणात चित्रपट क्षेत्रातील नेत्यांची पोकळी तयार झाली होती. दक्षिणेकडील राज्यांत चित्रपट अभिनेत्यांचेच वर्चस्व राहिले होते. आंध्र प्रदेश आता अभिनेत्यांची चलती नसली, तरी ते राजकारणात आहे. तमिळनाडूत तर अभिनेत्यांचे फॅन्स क्लब आहेत. निवडणुकीच्या काळात हेच फॅन क्लब पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखेच काम करीत असतात. करुणानिधी यांच्या पश्‍चात झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव स्टॅलिन यांनी द्रमुकची धुरा व्यवस्थित सांभाळली. त्यांना चांगल्या जागा मिळाल्या. बहिण आणि भावाने पक्ष सांभाळला असला, तरी एक भाऊ अलगिरी भाजपच्या तंबूत दाखल झाला आहे. भाजपने पी. पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वम यांच्या अण्णाद्रमुकशी युती केली आहे. तमिळनाडूत त्यांची सत्ता असली, तरी जनतेला आकर्षित करेल, असा एकही नेता त्यांच्याकडे नाही. भाजपने रजनीकांत यांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती. रजनीकांत यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उतरण्याचा निर्धार केला; परंतु त्यांची गणना भाजपची बी टीम म्हणूनच व्हायला लागली होती. या पार्श्‍वभूमीवर आता दुसरा चित्रपट अभिनेता कमल हासन यांनी रजनीकांत यांच्या पक्षाशी विधानसभेच्या निवडणुकीत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या पक्षाशी युती करण्याचे दिलेले संकेत अण्णाद्रमुकची पोकळी भरून काढण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणता येईल. त्याअगोदर कमल हासन यांनी एमआयएम पक्षाशीही युती करण्याचे जाहीर केले आहे. तमिळनाडूत 5.86 टक्के मुस्लिम आहेत. मतांच्या ध्रुवीकरणाचा हा प्रयत्न होत असून तमिळी राजकारणात काहीही होऊ शकते, याचे हे संकेत आहेत. तसे झाले, तर कदाचित तमिळनाडूत एक समर्थ पर्याय म्हणून ही आघाडी पुढे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केल्यानंतर, आता त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. कमल हासन यांनी रजीकांत यांच्याशी हात मिळवणी करण्यासंदर्भातील प्रश्‍नास उत्तर देताना सांगितले, की आमच्या केवळ एका फोनचा उशीर आहे. आमचे विचार सारखे आहेत आणि यामुळे लोकांना फायदा होत असेल, तर आम्ही आमचा ‘इगो’ सोडून एकमेकांची मदत करण्यास तयार आहोत, हे त्यांचे वक्तव्य नवी राजकीय समीकरणे घडण्याचे सूतोवाच करणारे आहे.

कमल हासन यांनी मंगळवारी दिवंगत नेते एम. जी. रामचंद्रन (एमजीआर)यांच्या ऐतिहासिक कार्यांना उजाळा दिला आणि म्हटले की माजी मुख्यमंत्र्यांचे नाते संपूर्ण तामिळनाडूशी होते. हासन यांनी ज्या पद्धतीने राजकारण प्रवेशाचे सूतोवाच केले, केला, ते पाहता त्यांनी एमजीआर यांच्या पाठिराख्यांना स्वतःच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न चालविलेला दिसतो. अण्णाद्रमुक पक्षाचे नाव न घेता कमल हासन म्हणाले, की जेव्हापासून मी आपल्या भाषणांमध्ये एमजीआर यांच्या नावाचा उल्लेख करू लागलो आहे, तेव्हापासून एक पक्ष नाराज झाला आहे व त्यांचा दावा आहे की एमजीआर केवळ त्यांचेच आहेत; मात्र एमजीआर तर संपूर्ण तामिळनाडूचे आहेत, केवळ एका पक्षाचे नाहीत. हेच कारण आहे लोक त्यांना ‘मक्कल तिलगम’(जन नेता) म्हणत होते. भलेही ते कोणत्याही पक्षाशी जोडलेले असतील. अगोदर ते द्रमुकमध्ये होते व नंतर त्यांनी अण्णामुकची स्थापना केली. राज्यातील संपूर्ण जनता एमजीआर यांना आपले मानते आणि जर असे असेल व सत्तारुढ पक्ष त्यांना केवळ एकाच पक्षाचे नेते म्हणत असेल, तर अशा भूमिकेविरोधात जनता निर्णय देईल.

रजनीकांत यांनी या अगोदर ट्वीट करत 31 डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असेही त्यांनी सांगितले. याशिवाय रजनीकांतशी निगडीत असलेली संघटना रजनी मक्कल मंद्रम(आरएमएम)ने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले, की ते रजनीकांत सुरू करत असलेल्या पक्षाच्या नावाची व निवडणूक आयोगाकडून त्यांना दिल्या जाणार्‍या चिन्हाबाबतच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. दुसरीकडे, प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या अगोदर नव्या संसद भवनाच्या उभारणीवरून टीका केलेली आहे. देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. त्यावरून कमल हासन यांचे  तामिळनाडूतील राजकारण हे भाजपच्या विरोधात आहे, हे स्पष्ट झाले. 2021 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. हासन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. चार-पाच महिन्यांवर आलेल्या निवडणुकीसाठी आताच प्रचार सुरू झाला आहे. निवडणुकीला सामोरे जाताना केवळ टाईमपास म्हणून नाही, तर जिंकण्यासाठी उतरायचे, ़असा दृढ निर्धार रजनीकांत आणि कमल हासन यांनी केलेला दिसतो.

तमिळी राजकारणात आता दोन नवे सुपरस्टार प्रवेश करणार आहेत. रजनीकांत यांनी आपला पक्ष रजनी मक्कल मंदरमच्या जिल्हा सचिवांची भेट घेतली होती. तसेच लवकरच आपला राजकीय पक्ष सुरू करण्याबाबत माहिती देणार असल्याचे म्हटले होते. रजनीकांत यांच्या समर्थकांनी त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, त्याच वेळी ही भेट झाली होती. नुकतेच तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात काही पोस्टर्स समोर आले होते. त्यामध्ये रजनीकांत यांना त्यांच्या राजकारणापासून लांब राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, चर्चा केल्यानंतरच रजनीकांत यांनी राजकीय पक्षाचा विचार केला आहे. रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. हासन यांनी आता रजनीकांत यांच्यांशी युती करण्याचे संकेत दिले असले, तरी हे प्रथमच घडते आहे, असे नाही. गेल्या वर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. रजनीकांत यांनी जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली, यामागे तमिळी राजकारणातील पोकळी भरून काढणे हाच त्यांचा उद्देश होता, हे स्पष्ट आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या तमिळनाडू भेटीत त्यांना रजनीकांत यांना भेटण्याची इच्छा होती; परंतु ही भेट न होण्यामागे नवे राजकीय संदर्भ असल्याचे आता स्पष्ट व्हायला लागले आहे. देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला, त्यावरून हासन यांच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. आता हे दोन सुपरस्टार एकत्र येऊन बेरजेचे राजकारण करून नवा अध्याय रचायला तयार झाले आहेत. 

Name

] ब्रेकिंग,850,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5545,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,2,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9969,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,660,देश,4146,नाशिक,776,पुणे,590,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15353,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12448,महाराष्ट्र सातारा,22,मुंबई,3441,विदेश,635,संपादकीय,1465,सातारा,3155,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अग्रलेख : तमिळी राजकारणातील बेरीज
अग्रलेख : तमिळी राजकारणातील बेरीज
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_829.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_829.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content