नऊ लाख रुपयांच्या कापसाची परस्पर केली होती विक्री नेवासे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी नेवासा/प्रतिनिधी ः नेवासे येथील शेतकर्यांचा तब्बल ...
नऊ लाख रुपयांच्या कापसाची परस्पर केली होती विक्री
नेवासे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
नेवासा/प्रतिनिधी ः नेवासे येथील शेतकर्यांचा तब्बल नऊ लाख रुपये किमतींचा कापूस ठरलेल्या ठिकाणी विक्रीस न नेता, इतर ठिकाणी परस्पर नेऊन त्याची विक्री करुन शेतकर्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नेवासे पोलिसांनी गुजरात येथुन तिघांना ट्रकमधील कापसासह ताब्यात घेण्यात आले आहे. या तिन्ही आरोपींना आज शनिवारी नेवासा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली.
याबाबत संदेश शरदलाल फिरोदीया कापूस व्यापारी यांनी 9 डिसेंबर रोजी नेवासा पोलीस स्टेशन मध्ये हजर फिर्याद दिली होती. फिर्यादीमध्ये म्हटले होते की, नऊ लाख, तेरा हजार, दोनशे साठ रुपये, किंमतीचा कापूस ट्रक क्रमांक जीजे-11व्हीव्ही 8805 मध्ये भरुन पटेल कॉटन इंडस्ट्रीज हळवद रोड धागद्रा जि-सुरेंद्रनगर येथे घेवून खाली करण्याचे ठरले होते. मात्र आरोपींनी संगनमत करुन, तसे न करता परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन नेवासा पोलिस स्टेशनमध्ये गुरनं 887/2020 भादवि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास अभिनव त्यागी, प्रभारी अधिकारी नेवासा पोलीस स्टेशन हे करत आहेत. या गुन्ह्याचा तपास हा गुजरात राज्यात असल्याने पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, श्रीरामपुर, उपविभागीय पोलीस अधिक्षक सुदर्शन मुंडे, शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असतांना सपोनि विजयकुमार ठाकुर, पोसई प्रदीप शेवाळे, पोना राहुल यादव, महेश कचे पोकॉ. अशोक कुदळे, वसिम इनामदार यांनी वेळोवेळी जामनगर गुजरात येथे जावून अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाकडील फुरकान शेख, प्रमोद जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्याकडील शिंदे, सोनटक्के यांनी केलेल्या तांत्रिक मदतीने गुजरात राज्यातुन आतापर्यंत तीन आरोपी नामे 1) कान्हा उर्फ देवल दिनेशभाई डाभी वय-25 रा- गोकुळधाम सोसायटी, दरेड ता.जि-जामनगर राज्य-गुजरात 2) बंदिया राम सोमात वय-23 वर्षे धंदा-गाडी व्यापार रा-सेल नं-04 आर्शिवाद सोसायटी, रणजीत सागर रोड ता.जि-जामनगर राज्य-गुजरात 3) भरतभाई आंबाभाई मांगुकिया वय-48 वर्षे रा-न्यु कतारगाव, वरीयाव रोड प्रमुख एव्हेन्यु सी-बिल्डींग रुम नं- 202 जि-सुरत राज्य गुजरात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ट्रक तसेच बेंडवान ता-डेडीयापाडा जि-नर्मदा राज्य गुजरात येथुन गुन्ह्यातील 8,48,000/- रुपये किंमतीचा कापुस जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीवर धरणगाव पोलिस स्टेशन जि-जळगाव येथे गुरनं 1220/2020 भादवी-407, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीतांना न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली आहे. सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील सो, मा अपर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ दिपाली काळे मॅडम, मा उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे येथील सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुर, प्रदीप शेवाळे, भरत दाते, राहुल यादव, महेश कचे, पोकॉ. अशोक कुदळे, वसिम इनामदार नेवासा पोलीस स्टेशन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपुर येथील पोना फुरकान शेख, पोकॉ. प्रमोद जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्याकडील पोना शिंदे, सोनटक्के यांनी केली असून, पुढील तपास अभिनव त्यागी, प्रभारी अधिकारी व पोकॉ अशोक कुदळे हे करत आहेत.