सुपा येथील सय्यद वस्तीवरील व्यक्तींचे मनोबल खच्चीकरण शशिकांत भालेकर/पारनेर ः पारनेर तालुक्यातील सुपा येथील मतदार यादीत बांगलादेशी मतदार घु...
सुपा येथील सय्यद वस्तीवरील व्यक्तींचे मनोबल खच्चीकरण
शशिकांत भालेकर/पारनेर ः पारनेर तालुक्यातील सुपा येथील मतदार यादीत बांगलादेशी मतदार घुसवले गेले असल्याची चर्चा होत आहे. मात्र या चर्चेमुळे जे लोक वर्षानुवर्षे येथे राहिलेत त्यांचे सर्व कागदपत्र महाराष्ट्रातील आहेत. आणि तरीही त्यांना अशा प्रकारे निवडणुकीचा स्वार्थ समोर ठेवून ही हिणवल्यामुळे त्यांचे मनोगत खच्चीकरण आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही काही बाहेरून आलेलो नाही. आम्ही महाराष्ट्रीय आहोत येथे वडिलोपार्जित अनेक वर्षे वास्तव्य करत आहे. तरीही अशा प्रकारचे राजकारण पुढे ठेवून आमच्यावर थेट माध्यमांद्वारे आरोप केले जातात. हे चुकीचे आहे हा प्रकार थांबला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुपा येथील बांगलादेशी मतदार यांना चुकीच्या पद्धतीने मतदार यादी मध्ये समाविष्ट केले गेले आहे अशा प्रकारची तक्रार काही संघटना व लोकांनी केली होती त्यानुसार त्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार ज्योती देवरे यांनी स्वतः तिथे जाऊन पाहणी केली. मात्र तेथे कोणत्याही प्रकारची तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. उलट हे लोक अनेक दिवसापासून याच भागांमध्ये राहत असल्याचे पुरावे त्यांच्याकडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे देवरे यांनी या लोकांना मतदार यादी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केली असल्याची हरकत फेटाळून लावली आहे. व त्याचे नावे नियमानुसार मतदार यादीत घेतले गेले आहे असे सांगितले. मात्र तरीही या लोकांना या हरकती मुळे खूप त्रास झाला आहे. त्यांना बांगलादेशी म्हणून संबोधल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याने आम्ही महाराष्ट्रीयनच आहोत व अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे आहेत असे सांगितले. याबाबत त्यांनी सांगितले की, आमचे समाजाचे जे लोक आहेत हे हातावर पोट भरणारे लोक आहेत अशिक्षित असल्याने जीवावर उदार होऊन हे लोक गावोगावी जाऊन खेळ करत असतात. यामध्ये केसाला बांधून गाड्या ओढणे, दाताने गाड्या ओढणे, अंगावरून गाड्या नेतात डोक्याने नारळ फोडतात असे समाज मनोरंजनाचे काम करत असतात. हा समाज नाशिक धुळे सांगली बीड जालना आदी ठिकाणी वसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही रांजणगाव मशीद या भागात या लोकांचे वास्तव्य होते. त्यानंतर त्यांनी सुपा येथे आपले वास्तव केले आहे. राजकारणामुळे सुप्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे मात्र या गरीब लोकांना यामध्ये भरडले जात गरीब कष्टकरी लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
बांगलादेश काय आहे ? कुणीकडे आहे? हे देखील आम्हाला माहिती नाही. चाळीस वर्षापासून सुपा व रांजणगाव येथे राहत आहे. आमची जात सय्यद असून आम्ही भटक्या समाजातील असल्याने अनेक ठिकाणी खेळ दाखवण्यासाठी जात असता.े मात्र ते झाल्यावर पुन्हा येथेच येऊन राहतो. आमच्याकडे मतदान कार्ड आहे. रेशन कार्ड आहे. आधार कार्ड आहे. आम्ही येथे रेशन घेत आहे.
निजाम मेहबूब शेख