बीड । प्रतिनिधीः- नाशिक मुंबई कंदील रात्रीच्या वेळी वाहने पेटून देण्याचे आता बीड शहरात पोहचले असून शहरातील शहंशाह नगर भागात रात्री अज्ञात मा...
बीड । प्रतिनिधीः-
नाशिक मुंबई कंदील रात्रीच्या वेळी वाहने पेटून देण्याचे आता बीड शहरात पोहचले असून शहरातील शहंशाह नगर भागात रात्री अज्ञात माथेफिरूं तीन दुचाकीला आग लावून पेटवून देऊन नुकसान केल्याची घटना घडली या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे
बीड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहेंशाहनगर भागात दारासमोर लावलेल्या तीन दुचाकी अज्ञात माथेफिरूने जाळल्याची घटना रात्री घडली असून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दुचाकीचे मालक दुपारी गेले होते. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी बिट अंमलदार एएसआय गांधले यांनी भेट दिली.शहेंशाहनगर भागातील तीन घरांसमोर लावलेल्या मोटारसायकली रात्री अज्ञात माथेफिरूंनी जाळल्याने या भागामध्ये एकच खळबळ उडाली. सदरील या मोटारसायकल कोण आणि कुठल्या उद्देशाने जाळल्या याचा तपास पोलिस करत आहेत.