क्लासचालकांकडून नियमावलींना केराची टोपली संगमनेर/प्रतिनिधी : कोवीड 19 च्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणुन शासनाने निर्बंध घातलेल्या खाजगी ...
क्लासचालकांकडून नियमावलींना केराची टोपली
संगमनेर/प्रतिनिधी : कोवीड 19 च्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणुन शासनाने निर्बंध घातलेल्या खाजगी शिकवणी देणार्या शिक्षकांना दम निघत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. शासनाने निर्गमित केलेल्या नियमावलींना केराची टोपली दाखवित खाजगी शिकवणी देणारे शिक्षक आणि क्लासचालक बिनदिक्कतपणे वर्ग भरवत आहे.
शासनाच्या आदेशानुसार ऑनलाइन शिक्षण देणे अपेक्षित असतानाही क्लासमध्ये हजर राहणे सक्तीचे करत मुलांचे वर्ग सुरु असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या क्लासचे शटर अर्थे ऊघडे ठेवून आणि विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून तात्पुरता अर्ज घेऊन सदर क्लास चालकांनी बिनधास्तपणे आपले क्लास सुरू केलेले आहे. तसेच शासनाने 9 वी ते 12 च्या वर्गांना मान्यता दिल्याचेही त्यांचे म्हणने आहे. करोना महामारी अजुन आटोक्यात आलेली नसतानाही विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याचे धाडस पालकांकडून व क्लास चालकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांना अनेकदा सांगूनही त्यांच्याकडून विशिष्ट अंतराचे बंधन पाळले जाईल याची खात्री देता येणार नाही. त्यामुळे दम न निघणार्या क्लासचालकांना वेळीच आळा घालण्याची अपेक्षा सामान्य नागरीक करत आहेत. बोर्डाच्या परीक्षेची भिती पालकांना व विद्यार्थ्यांना दाखवुन क्लासची गरज असल्याचे भासविण्याचे काम काही खाजगी शिक्षक करित आहे. यावर कळस म्हणजे काही क्लासवाल्यांनी आपल्या घरातच क्लास भरविण्याची शक्कल लढविली आहे. संपूर्ण जग करोनाच्या सावटाखाली असताना क्लासवाल्यांचा अनाठायी आततायीपणा विद्यार्थी तसेच पालकांना महागात पडू शकतो.
अनेक क्लासवाल्याची उपजीविका त्यांच्या क्लासमधील विद्यार्थ्यांवरच अवलंबून आहे. त्यामुळे असे क्लासचालक क्लास सुरू करत असावेत. परंतू सध्याच्या काळात ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणाला पर्याय नाही. त्यामुळे खाजगी क्लासवाल्यांनी शासनाकडून परवानगी आल्यानंतरच आपले क्लास सुरू करायला हवेत.
प्रा. नितिन नवले, जिज्ञासा क्लासेस, संगमनेर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शाळांसह खाजगी शिकवण्या किंवा क्लासेस बंदच ठेवण्याचे शासणाचे आदेश आहेत. संगमनेर शहरात अशा काही खाजगी शिकवण्या सुरु असतील तर त्याबाबत संबंधितांनी तक्रार करावी. प्रशासन त्यांवर योग्य ती कारवाई करेल.
अमोल निकम, तहसिलदार, संगमनेर.