कायदा व सुव्यवस्थेचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासमोर आव्हान अहमदनगर जिल्ह्यातील संवेदनशील तालुक म्हणून जामखेडची ओळख आहे. मात्र या...
कायदा व सुव्यवस्थेचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासमोर आव्हान
अहमदनगर जिल्ह्यातील संवेदनशील तालुक म्हणून जामखेडची ओळख आहे. मात्र या तालुक्यात राजकीय वरदहस्तामुळे 2020 या वर्षांत गुन्हेगारीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. कर्जत-जामखेड तालुका हा हायप्रोफाईल मतदारसंघ म्हणून पूर्वीपासून ओळखला जातो. कारण पूर्वी या मतदारसंघात माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे वास्तव्य आहे. तर विद्यमान आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांचा हा मतदारसंघ आहे. जामखेड तालुका राजकीय दृष्टीने शेजारच्या तालुक्याच्या मोठ्या नेत्याचेंही वर्चस्व असलेला तालुका मराठवाड्याच्या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे. राजकीय षडयंत्रामूळे संवेदनशील होत असलेल्या जामखेड पोलिस स्टेशनचा कारभार नूकताच 5 डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी हाती घेतला आहे.
दोन वर्षांपूर्वी शहरात डॉ. सादेक पठाण यांच्यावरील गोळीबार व राळेभात बंधूंचे दूहेरी हत्याकांडानंतर अतिसंवेदनशील परिस्थितीत जामखेड पोलिस स्टेशनची धूरा पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्याकडे तडकाफडकी सोपविण्यात आली होती. ढासळलेली कायदा सुव्यवस्था व पालकमंत्र्यांच्या आड स्थानिक पदाधिकार्यांच्या हस्तक्षेपाच्या काळातही कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पेलले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सप्टेंबर 2019 मध्ये पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी जामखेड पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला. सुरुवातीचा काळ प्रभावहीन राहीला निवडणूकीची धामधूम गेली काही दिवसांत देशात करोनाचा कहर आला. महाराष्ट्रात कोरोनामुळे जामखेडचं नाव हाँटस्पाँट भाग म्हणून कूप्रसिध्द झाले. विपरीत सामाजिक परिस्थिती निर्माण झाली अशा वेळी कोरोनाबरोबरच सामाजिक सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे कठीण झाले होते. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व महसूल विभाग यांची खरी कसोटी लागली होती. कोरोना काळात प्रशासनाच्या सर्वच विभागाने चांगले काम केले. त्यात माणूसकी जपणारया सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रशासनाला मोठे सहकार्य केले. लॉकडाउन असूनही शहरासह तालुक्यात क्राईम रेट वाढला आहे हे पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या लॉकडाउन काळतील गून्ह्यांची आकडेवारी सांगत आहे.
जामखेड पोलिस स्टेशनला गेल्या वर्षी 61 कर्मचारी होते. सध्या एक पी आय,दोन एपीआय,एक सपोनि व 48 कर्मचारी आहेत.खर्डा व नान्नज हे दोन दूरश्रेत्र आहेत.जामखेड शहर, राजूरी, फक्राबाद,पाटोदा,साकत हे बीट आहेत गेल्या वर्षी तूलनेत 13पोलिस कर्मचारी कमी झाले. जामखेड नगरपरिषद व 87 गाव 58 ग्रामपंचायत एवढ्या मोठ्या तालुक्याची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मोठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. वारंवार पोलिस संख्या वाढवून मिळाली यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविले आहेत मात्र याकडे लोकप्रतिनिधीसह वरिष्ठांनी साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. मुळात तालुक्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने जो पुढाकार आवश्यक आहे तो का दाखवला जात नाही? हे जामखेडकरांना पडलेले कोडे आहे. नव्या वर्षांत धाडसी कारवाया करून गून्हेगारीवर जरब बसवण्यात जर जामखेड पोलीस यशस्वी झाले तर तालुक्यात कायद्याचे राज्य पाहता येईल अन्यथा मागचेच दिवस पुढे ही नामुष्की जामखेडकरांच्या वाट्याला पुन्हा येऊ नये.याकरिता पोलीस प्रशासन व राजकीय स्तरावरून प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या.
जामखेडला पदभार स्वीकारल्यानंतर लगेच अनेक वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यातील 7 फरार आरोपींना शिताफीने अटक केली.अवैध दारू, अवैध वाळू, विरोधात धडक कारवाई चालू केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजी गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी समाजातील वेगवेगळ्या घटकांचा समन्वय रहावा म्हणून छोटे मोठे व्यापारी, गावचे पोलीस पाटील, माजी सैनिक तसेच गावोगावी ग्रामस्थांच्या बैठका घेऊन समस्यांवर चर्चा करत जागृती करतांना दिसत आहेत.
अनेक घटना मात्र दाखल एकही नाही
जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत जामखेड पोलिसांनी दंगलीचे 17, खूनाचे 1,खूनाचा प्रयत्न8,दरोडा 2,जबरी चोरी13, घरफोडी32,आर्म अँक्ट2,विनयभंग9,बलात्काराच्या 6, मोटारवाहन चोरी15,जूगार 21,वाळू चोरी 7,दारूची 100,पळवून नेने 3, ठकबाजी 3,कोरोना प्रतिबंधक 188 नूसार 394, दुखापती57, गून्हयांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती क्राईम विभागाचे पोकाँ दत्तु बेलेकर यांनी दिली आहे. शहरासह तालुक्यात सावकारकी मोठ्या प्रमाणावर चालू आहे. व्याजाच्या पैशासाठी धमकावणे, हिसकावणे, पळवणे अशा अनेक घटना घडल्या. अनेकांनी गाव सोडले आहे. अनेकजण पोलीसांपर्यत आले मात्र गेल्या काही वर्षांत कोणाही सावकाराविरूध्द फिर्याद दाखल झाली नाही का? याबद्दल मोठे कोडे आहे.