$type=ticker$snippet=hide$cate=0

पुढच्या शंभर दिवसांत दररोज काँग्रेसचा जनता दरबार

प्रत्येक प्रभागात नागरिकांना भेटणार; स्वबळाची तयारी सुरू मुंबई / प्रतिनिधी : देशात सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिक...



प्रत्येक प्रभागात नागरिकांना भेटणार; स्वबळाची तयारी सुरू

मुंबई / प्रतिनिधी : देशात सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. माझी मुंबई, माझी काँग्रेस हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये, असा सवाल मुंबई काँग्रेसने केला आहे. 


आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही मुंबईकरांपर्यंत पोहोचू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ,’ अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली. ’मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत. महाविकास आघाडीचे सदस्य आहोत. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकासआघाडीचा काहीही संबंध नाही. कारण आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे 227 जागांवर लढण्याचा मनसुबा मी पहिल्या दिवशी सांगितला होता. काल पदभार स्वीकारला तेव्हा पुनउल्लेख केला,’ असेही ते म्हणाले. 


आम्ही पुढील शंभर दिवसांत प्रत्येक वॉर्डात जाऊ. तिथे जनता दरबार करू. लोकांची कामे करू. कार्यकर्त्याला विचारू आणि त्यानंतर वरिष्ठांना 227 जागा का लढायच्या हे सांगू,’ असेही जगताप यांनी सांगितले. ’भाजपबरोबर शिवसेना सत्तेत असताना मुंबई महानगरपालिकेत भाजप विरोधी पक्षात होता. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना भाकिते करायची सवय आहे. भविष्य पाहून सरकार येत नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जात आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी भाई जगताप यांची मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. एकीकडे शिवसेनेकडून अनेक नेते पुढील सर्व निवडणुका एकत्रित लढण्याची भाषा करत आहे; मात्र दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र शिवसेनेच्या या मताशी सहमत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाविकासआघाडीतील तिन्ही घटक पक्ष येत्या महापालिका निवडणुकांमध्ये एकत्रित की स्वबळावर लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5757,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,196,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,37,satara,138,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10318,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,704,देश,4433,नाशिक,805,पुणे,739,बीड,1437,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16405,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13641,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3697,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1548,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पुढच्या शंभर दिवसांत दररोज काँग्रेसचा जनता दरबार
पुढच्या शंभर दिवसांत दररोज काँग्रेसचा जनता दरबार
https://d282wbz2keffpz.cloudfront.net/wp-content/uploads/2020/12/21190326/bhai-jagtap-BMC-min-1.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_861.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_861.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content