कराड / प्रतिनिधी : नगरपरिषद कराडच्या वतीने माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कराड शहरात पाच ठिकाणी हवा प्रदूषण मापन यंत्र, अम्बिएन्ट एअर क्वालिट...
कराड / प्रतिनिधी : नगरपरिषद कराडच्या वतीने माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कराड शहरात पाच ठिकाणी हवा प्रदूषण मापन यंत्र, अम्बिएन्ट एअर क्वालिटी मॉनिटरिंग मशीन बसविण्याचा शुभारंभ दत्त चौक येथे मान्यवरांच्या उपस्थित झाला. या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक आणा पावसकर, सभापती विजय वाटेगावकर, गटनेते सौरभ पाटील, सुहास जगताप, प्रीतम यादव, ए. आर. पवार, सौ. पावसकर, प्रा. जे. पी. काशीद, देवानंद जगताप, चंदू जाधव, प्रकाश खोचीकर, रमेश पवार उपस्थित होते.
हे मशीन शहरातील कृष्णा नाका, विजय दिवस चौक, दत्त चौक, चावडी चौक, पोपट भाई पेट्रोल पंप इ. ठिकाणी लावण्यात आले. शहरात वाढणारी वाहनांची संख्या व त्यामुळे होणारे वायू प्रदूषण व त्याचा परिणाम मनुष्याच्या श्वसनावर होतो. या मशीनद्वारे हवेतील धूलिकण व घातक वायू म्हणजे सल्फर ऑक्सिड व नायट्रोजन ऑक्सिड तसेच नाका वाटे जाणारे धूलिकण व तरंग नारे धूलिकण याचे मोजमाप केले जाते, असे प्रा. काशीद यांनी सांगितले.