निफाड प्रतिनिधी : निफाड तालुक्यातील वनसगाव,सारोळे खुर्द,खडक माळेगाव,रानवड,सावरगाव,नांदुर्डी,उगाव,खेडे,सोनेवाडी आदी गावातील द्राक्ष उत्पादक ...
निफाड प्रतिनिधी : निफाड तालुक्यातील वनसगाव,सारोळे खुर्द,खडक माळेगाव,रानवड,सावरगाव,नांदुर्डी,उगाव,खेडे,सोनेवाडी आदी गावातील द्राक्ष उत्पादक शेतकरी परकीय व नगदी चलन मिळवून देण्यारे द्राक्ष पिकधोक्यात आले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी फवारणीच्या वाढत्या खर्चामुळे संकटात सापडले आहे. .गेल्या चारपाच दिवसांपासून नाशिक जिल्हा व तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या बेमोसमी पावसाने आणि ढगाळ वातावरणात तयार झाले आहे.
े गतवर्षी द्राक्ष हंगामातच कोरोना मुळे देशांतर्गत सीमा बंद केल्याने विक्री व्यवस्था बंद झाली होती. याचा परिणाम थेट द्राक्ष उत्पादक शेतकर्यांवर झाला आहे. परिणामी कवडीमोल भावाने द्राक्ष विकावी लागली होती . यावर्षी मागील वर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसामुळे नुकसान झाले आहे.4/5 दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस पडत आहे. निफाड तालुक्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर धावपळ उडाली. शेतकर्यांच्या अनेक द्राक्षबागा दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेत आहे. दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये असणार्या बागांना जास्त फटका बसत आहे. बागांची गळ आणि कुज होते. ढगाळ हवामानाचा फटका द्राक्ष बागांना बसतो. गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने द्राक्ष बागांना पुरेसे ऊन मिळत नाही. त्यामुळे बागांची गळ, कूज,डाऊनी,करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. निफाड तालुक्यातील 40 टक्के द्राक्षबागा गळीने खराब झाल्या आहे .यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे.द्राक्ष पिकांना सातत्याने फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्चात भरमसाठ वाढ होत आहे. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळे द्राक्ष पीक यंदा तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेे.
द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना दरवर्षी द्राक्ष बाग फुलवताना विविध संकटांचा सामना करावा लागत असून द्राक्ष पीक घेणे सद्यस्थितीत अवघड झाले आहे. अमाप खर्च उत्पादन कमी यामुळे दिवसेंदिवस द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत बुडत चाललेला असून या वर्षी तरी द्राक्ष पिकाला चांगला भाव मिळावा हीच शेतकर्यांची अपेक्षा आहे.-प्रविण पडोळ,शेतकरी, सोनेवाडी.