बीड । प्रतिनिधीः- विहिरीतून पाणी घेत असताना एका 32 वर्षीय महिलेचा पाय घसरल्याने सदरील महिला पाण्यात बुडून मरण पावली. ही घटना आज सकाळी पालवण ...
बीड । प्रतिनिधीः-
विहिरीतून पाणी घेत असताना एका 32 वर्षीय महिलेचा पाय घसरल्याने सदरील महिला पाण्यात बुडून मरण पावली. ही घटना आज सकाळी पालवण चौकातील मस्के वस्ती येथे घडली.
मंदाकिनी कृष्णा उबाळे (वय 32) ही महिला आज सकाळी शौचास गेली होती. या वेळी तेथीलच असलेल्या एका विहिरीतून पाणी घेत असताना तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. सदरील मृतदेह शोधण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण ठाण्याचे पो.कॉ. शेलार हे करत आहे.