अज्ञात वाहनाच्या धडकेने १ आडगावचा इसम जागीच ठार..... आडगाव प्रतिनिधी प्रफुल्ल पवार.... आडगाव शिवार मुंबई आग्रा हायवे येथे जयस्वाल गॅरे...
अज्ञात वाहनाच्या धडकेने १ आडगावचा इसम जागीच ठार.....
आडगाव प्रतिनिधी प्रफुल्ल पवार....
आडगाव शिवार मुंबई आग्रा हायवे येथे जयस्वाल गॅरेज समोर शुक्रवार रात्री २ च्या सुमारास दुचाकी नंबर एम एच १५ ए जे ७३३५ घराकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गाडी चालक राहुल सुदाम नवले राहणार नवले मळा यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात घडला त्यावेळी आडगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी हवालदार नारोडे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना पालथ्या अवस्थेत पडलेला हा इसम आढळला. त्याच्या तोंडातून पोटातून व गुडघ्यातून प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असा अंदाज आहे.पांढऱ्या रंगाची गाडी इसमाला धडक मारून निघून गेल्याने त्या विरोधात आडगाव पोलिस स्टेशन मध्ये ३०४,२७९( ठोस मारून पळून गेल्याने अशा) प्रकारे गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्याचा शोध आडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर सुभाष जाधव हे करीत आहेत. मुंबई आग्रा हायवेवर अंधाराचे सावट पाहायला मिळते म्हणून के के वाघ कॉलेज ते जकात नाक्यापर्यंत पूर्ण पथदीप लावावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होताना दिसून येत आहे.