$type=ticker$snippet=hide$cate=0

संसदेच्या बांधकामाला परवानगी नाही – सर्वोच्च न्यायालय

मोदी सरकारच्या नव्या संसदेच्या बांधकाम मोहिमेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नव्या संसदेच्या बांधकामाचा कोनशिला समारंभ सोमवारी होत...


मोदी सरकारच्या नव्या संसदेच्या बांधकाम मोहिमेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नव्या संसदेच्या बांधकामाचा कोनशिला समारंभ सोमवारी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने पायाभरणीला मंजुरी दिली आहे.

मात्र सेंट्रल विस्टा अर्थात नव्या संसदेच्या उभारणीला आक्षेप घेणाऱ्य याचिकांवर निकाल दिला जात नाही तोपर्यंत कोणत्याही नव्या बांधकामाला तसंच तोडकामाला परवानगी नसेल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारच्या नव्या संसदेच्या उभारणीसंदर्भात आक्रमक भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. नव्या संसदेच्या उभारणीचं काम टाटा प्रोजेक्ट्स कंपनीला देण्यात आलं आहे. नव्या संसदेच्या वास्तूचं आरेखन एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केलं आहे.

2022 पर्यंत नव्या संसदेची वास्तू बांधून तयार होईल, असं या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. ही वास्तू 64,500 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर उभी राहणार आहे. या प्रकल्पासाठीचा साधारण खर्च 971 कोटी रुपये एवढा असणार आहे.

या वास्तूमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी विशेष प्रवेशद्वार असेल. लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती आणि खासदारांसाठी एक प्रवेशद्वार असेल. खासदारांसाठी एक, नागरिकांसाठी दोन आणि इतर आणखी एक प्रवेशद्वार असणार आहे. ही वास्तू चारमजली असणार आहे. यामध्ये एकूण 120 कार्यालयं असणार आहेत.

लोकसभेचं क्षेत्रफळ 3,015 स्क्वेअर मीटर असेल. यामध्ये 888 सदस्यांची आसनव्यवस्था असणार आहे. राज्यसभा 3,220 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाची असणार असून, 384 सदस्यांची आसनव्यवस्था असेल. संयुक्त अधिवेशनावेळी 1,224 सदस्य एकाचवेळी बसू शकतील.

Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5757,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,196,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,37,satara,138,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10315,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,704,देश,4433,नाशिक,805,पुणे,739,बीड,1437,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16401,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13637,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3696,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1548,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: संसदेच्या बांधकामाला परवानगी नाही – सर्वोच्च न्यायालय
संसदेच्या बांधकामाला परवानगी नाही – सर्वोच्च न्यायालय
https://static.langimg.com/thumb/msid-72444961,width-1200,height-900,resizemode-75/maharashtra-times.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_874.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_874.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content