$type=ticker$snippet=hide$cate=0

फुललं कमळ; हात जायबंदी

  न्यू विंडोः लोगो/भागा वरखडे :    राजस्थानात आतापर्यंत ग्रामीण भागात काँग्रेसचं तर शहरी भागात भाजपचं वर्चस्व असायचं. या वेळी मात्र भाजपनं  ...

 


न्यू विंडोः लोगो/भागा वरखडे : 


  राजस्थानात आतापर्यंत ग्रामीण भागात काँग्रेसचं तर शहरी भागात भाजपचं वर्चस्व असायचं. या वेळी मात्र भाजपनं  ग्रामीण भागातही मुसंडी मारली आहे. विधानसभेच्या निवडणुकीला तीन वर्षे बाकी असली, तरी काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. परिवारवाद आणि जातीयवादाच्या शृंखला काँग्रेसच्या प्रगतीत अडथळा ठरत आहेत. 

 

राजस्थान काँग्रेसमधील गटबाजी अजूनही संपलेली नाही. भारतीय जनता पक्षाला सचिन पायलट यांना हाताशी धरून ऑपरेशन लोटस यशस्वी करता आलेलं नाही. काँग्रेसचं सरकार वाचलं असलं, तरी त्यातून बोध घ्यावा, असं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना वाटत नाही. पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काढलं, तरी आपलं काही बिघडत नाही, असं त्यांना वाटत होतं; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. राजस्थानातील पंचायत निवडणुकीचे निकाल गेहलोत सरकार आणि काँग्रेससाठी चिंताजनक आहेत. भाजपनं पहिलं स्थान पटकावलं असून त्यामुळं कार्यकर्त्यांचा उत्साह आणि उमेदही वाढणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत काँग्रेस सत्तेत असूनही मागं पडली, निवडणुकीचं नियोजन करून लढविल्यामुळे भाजपला यश आलं. निवडणुकीच्या निकालात खेड्यांमध्ये कमळ फुललं आणि हात जायबंदी झाला. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना शेतकर्‍यांचा असलेला विरोध लक्षात घेऊन त्याचं गेहलोत सरकारनं भांडवल केलं. 

केंद्रीय कृषी कायद्याच्या मदतीनं खेड्यांची सत्ता ताब्यात घेण्याची काँग्रेसची योजना फोल ठरली. निवडणुकीतील निकालानंतर सरकार व संघटनेत काँग्रेसविषयी असंतोष वाढू शकतो. मंत्रिमंडळ विस्तार आणि राजकीय नेमणुकांना उशीर झाल्यामुळं आधीच आमदार व नेत्यांमध्ये असंतोष आहे. एकीकडं कोरोनाच्या संकटामुळं काँग्रेसचे नेते गावांकडं फिरकत नसताना भाजपच्या नेत्यांनी मात्र ग्रामीण भाग पिंजून काढला. लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार भाजप पाडायला निघाला आहे, असा घोष कितीही काळ करीत राहिलं, तरी जनता केवळ त्यावर सत्ता देत नाही, हे आता काँग्रेसला चांगलंच कळलं असेल. काँग्रेस सरकारचे मंत्री व आमदार गावात गेले नाहीत. जयपूरमध्ये बसून तिकिटांचं वाटप केले. त्याचवेळी भाजपनं वरिष्ठ नेत्यांना खेड्यात पाठवलं. भाजपनं कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आदर करीत उमेदवारी वाटप केली. परिणामी काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या. ग्रामीण भागात मिळालेल्या यशामु ळं प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया आणि त्यांची भाजपमधील टीम पक्षाच्या अंतर्गत राजकारणात बळकट होईल.


काँग्रेसमधील गटबाजी, सचिन पायलट गटानं सक्रिय नसणं, मंत्र्यांचा फक्त कार्यकर्त्यांशीच संपर्क असणं, आमदारांच्या इच्छेनुसार नातेवाइकांना तिकीट देणं आणि मागील ाकाही महिन्यांपासून राज्य ते ब्लॉक स्तरापर्यंत संघटना नसणं ही काँग्रेसच्या पराभवाची प्रमुख कारणं आहेत. काँग्रेसने केवळ आमदारांनकडं उमेदवारी वाटप दिली. त्यांनी आपल्या नातेवाइकांना उमेदवारीच्या खिरापती वाटल्या. सामान्य कार्यकर्ते त्यामुळं दुरावले. आमदारांकडून उमेदवारी घेतलेले बबुतांश जणांचा निवडणुकीत पराभव झाला. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटविताना राज्यातील ब्लॉक काँग्रेस समित्या विघटन करण्यात आल्या, त्या अद्याप तयार झालेल्या नाहीत. प्रदेशाध्यक्ष डोटासरा आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत एकत्र सत्ता व संघटनेचे निर्णय घेत आहेत. ते एकचा गटाचे आहेत. दुसर्‍या गटाला जाणीवपूर्वक डावलण्यात येत आहे. त्याचा फटका पक्षाला बसला. पक्षाची संघटनाच कमकुवत झाल्यामुळं निवडणूक प्रचार योजनानुसार चालत नाही. प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात पक्षाचा पराभव झाला. त्यामुळं त्यांची निवडच कशी चुकीची आहे, यावर शिक्कामोर्तब झालं. पायलट तसंच राज्य मंत्रिमंडळ सदस्य रघु शर्मा, महेंद्र चौधरी, उदयलाल अंजना, अशोक चंदना यांच्या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसच्या 23 आमदारांनी आपल्या नातेवाइकांना तिकिटं दिली, त्यातील बहुतेक हरले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुनिया यांनी ज्येष्ठ नेत्यांची एक टीम तयार करून निवडणूक लढविली आणि ज्येष्ठ नेत्यांना जिल्ह्यांच्या प्रभारीपदावर नेमण्यात आलं. तिकिट निश्‍चित करण्याचं काम कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार करण्यात आलं. गेहलोत सरकारविषयीच्या ग्रामस्थांच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी एक ब्लॅक पेपर प्रसिद्ध करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला 1718, भाजपला 1836, अपक्षांना 422 जागा, तर नॅशनल डेमोक्रॅटिक पक्षाला 56 जागा मिळाल्या. माकपनं 16 आणि बसपनं तीन जागा जिंकल्या. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं 323, काँग्रेसला 246, अपक्षांना 17, नॅशनल डेमोक्रॅटिक पक्षाला दोन जागा जिंकता आल्या. 


गेहलोत आणि प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं, की आम्ही कोरोनाशी सामना करीत होतो. त्यामुळे सरकारी योजनांचा प्रचार करु शकलो नाही. अर्थात त्यांचा हा युक्तिवाद पटणार नाही. त्यामुळं तर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडून या पराभवाचा अहवाल मागितला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रदेश प्रभारी सरचिटणीस अजय माकन यांनी पराभवाच्या कारणाबद्दल राज्य सत्ता आणि संघटनेचा अहवाल मागविला आहे. शेतकरी चळवळीला चालना दिली असली, तरी पराभव हा काँग्रेसच्या दृष्टीनं धोक्याची घंटा आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच पंचायत निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला इतका मोठा पराभव पत्करावा लागला. खेड्यात अजूनही काँग्रेसची चलती होती, ती या वेळी संपली. आतापर्यंतचा इतिहास असा आहे, की काँग्रेसनं नेहमीच पंचायती ताब्यात घेतल्या आणि शहरी संस्थांमध्ये भाजपला सत्ता मिळाली; परंतु या वेळी खेेड्यातही भाजपची पाळंमुळं विस्तारल्यानं काँग्रेसचे नेतृत्व चिंताग्रस्त झालं आहे. पराभवानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील गट आता सक्रिय झाला आहे. पक्षाच्या पराभवासाठी डोटासरा हे सर्वांधिक जबाबदार आहेत. सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष झालेले डोटासरा हे शिक्षणमंत्रीही आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एकाही जिल्ह्याचा दौरा केला नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला नाही. त्यांनी आत्तापर्यंत कार्यकारिणी किंवा जिल्हा व ब्लॉक समित्यांची स्थापना केली नाही. कोरोनामुळं बहुतेक मंत्री त्यांच्या मतदारसंघात गेले नाहीत. याचाच परिणाम म्हणजे ऐंशी टक्के मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघात पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पंचायत समिती निवडणुकीत पायलट पूर्णपणे अलिप्त राहिले. त्यांनी तिकिट वाटपापासून प्रचारापर्यंत कशातही रस घेतला नाही. या पराभवानंतर पायलट आणि त्याचे समर्थक पुन्हा सक्रिय होऊ शकतात. पक्षालाही संघटनात्मक नेतृत्व पुन्हा पायलट यांच्याकडं देण्याची वेळ येऊ शकते. 


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5584,letest News,590,Loksabha-2019,164,Maharashtra,118,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,22,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10052,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,670,देश,4204,नाशिक,780,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15572,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12682,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3493,विदेश,638,संपादकीय,1481,सातारा,3172,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: फुललं कमळ; हात जायबंदी
फुललं कमळ; हात जायबंदी
https://lh3.googleusercontent.com/-8YquWePB3f8/X9Md4TBiwlI/AAAAAAABmB8/E7SmKqePZmg2E884TPAN3DMcbOjkHZKhQCLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-8YquWePB3f8/X9Md4TBiwlI/AAAAAAABmB8/E7SmKqePZmg2E884TPAN3DMcbOjkHZKhQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_875.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_875.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content