आमदार निलेश लंके व निघोज येथील मान्यवर पुढाऱ्यांची एकत्र बैठक निघोज/प्रतिनिधी : निघोज ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार न...
आमदार निलेश लंके व निघोज येथील मान्यवर पुढाऱ्यांची एकत्र बैठक
निघोज/प्रतिनिधी :
निघोज ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी रविवार दि. २० रोजी पारनेर येथील संपर्क कार्यालयात निघोज येथील मान्यवर पुढाऱ्यांची एकत्र बैठक घेऊन प्रत्येकाचे मते जाणून घेऊन तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. निघोज ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सहा प्रभाग असून एकून मतदारांची संख्या १०,०८१ असून यामध्ये प्रभाग नंबर १ मध्ये १३६६, प्रभाग नंबर २ मध्ये १५५२, प्रभाग नंबर ३ मध्ये १२७९, प्रभाग नंबर ४ मध्ये २३४८, प्रभाग क्रमांक ५ मध्ये १५१९, प्रभाग क्रमांक ६ मध्ये २०१७ अशी मतदार संख्या आहे. निवडणुक लढविण्यासाठी सत्ताधारी मंडळ, संदीप पाटील जनसेवा फौंडेशन, तीसरी आघाडीचे जनसेवा मंडळ व दारुबंदी विरोधीकृती समीतीच्या वतीने महिला मंडळ, अल्पसंख्याक समाज मंडळ असे पाच मंडळे निवडणुकीसाठी सज्ज आहेत. १७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी पाच मंडळांचे ८५ उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार असा ताळमेळ घालून शंभर सव्वाशे उमेदवारांमधून १७ उमेदवार बिनविरोध साठी निवडने अशक्यप्राय असले तरी सर्वांनीच आमदार निलेश लंके हे निर्णय देतील तो सर्वानुमते मान्य केला तर निवडणूक बिनविरोध होणे सहज शक्य आहे. निवडणुक बिनविरोध झाल्यास आमदार निलेश लंके यांनी जाहीर केलेला पंचवीस लाख रुपये निधी मिळणार आहेच शिवाय प्रत्तेक उमेदवाराचा निवडणुकीचा खर्च वाचणार आहे. यामागील निवडणुकीचा विचार केला तर पन्नास ते साठ लाख व्यक्तीगत खर्च नक्कीच वाचणार असून यातून एखादे सामाजिक काम उभे राहणार आहे. अशाप्रकारे आमदार लंके यांच्या बिनविरोध निवडणूक योजनेचे सर्वत्र कौतुक होत असून निघोज ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होइल अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
निघोज ग्रामपंचायत प्रभाग नंबर ४ मध्ये २३४८ मतदार संख्या ठेऊन या ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर एकप्रकारे प्रशासनाने अन्याय केल्याची भावना अल्पसंख्याक समाजातील लोकांनी व्यक्त केली असून हा एक प्रकारे अन्याय असून सर्व प्रभागांमध्ये समसमान मतदार संख्या ठेवणे गरजेचे होते असे मत व्यक्त होत आहे.