वडवणी । प्रतिनिधीः- उस उत्पादक शेतकर्यांचा साखर कारखान्याने गाळपासाठी नेलेल्या उसाला पहिला हप्ता 2500 रुपये प्रतिटन भाव द्यावा व लोकनेते सु...
वडवणी । प्रतिनिधीः-
उस उत्पादक शेतकर्यांचा साखर कारखान्याने गाळपासाठी नेलेल्या उसाला पहिला हप्ता 2500 रुपये प्रतिटन भाव द्यावा व लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव यांनी पहिला हप्ता 1600 रुपयांनी काढुन शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक केल्याच्या निषेधार्थ या व इतर मागण्यांसाठी दि.21 डिसेंबर सोमवार रोजी तेलगाव येथील साखर कारखाना गेट समोर उस उत्पादक शेतकरी, सभासद हे धरणे आंदोलन करणार आहेत तरी या आंदोलनात उस उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उस उत्पादक शेतकरी तथा मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील यांनी केले आहे.
माजलगाव मतदारसंघात लोकनेते सुंदरराव सोळंके कारखाना, छत्रपती साखर कारखाना, जय महेश शुगर असे तिन कारखाने असुन यामध्ये यावर्षी गाळपासाठी नेलेल्या शेतकर्यांच्या उसाला लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने 1600 रुपये प्रति टन पहिला हप्ता दिला आहे तर छत्रपती कारखाना 1900 रूपये व जय महेशने 2000 रुपये पहिला हप्ता दिला आहे तरी लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने कमी हप्ता काढलेला आहे त्यामुळे उस उत्पादक शेतकर्यां मध्ये तिव्र संतापाची भावना निर्माण झालेली आहे तरी शेतकर्यांच्या उसाचा पहिला हप्ता 2500 रूपये प्रति टन द्यावा, एफ आर पी प्रमाणे उस दर आठ दिवसात जाहीर करावा, उस उत्पादक सभासद शेतकर्यांना 265 जातीच्या उस लागवडीसाठी परवानगी द्यावी, शेतकर्यांना उसाचे बिल 15 दिवसात द्यावे, साखर उत्पन्ना शिवाय कारखान्याने जे काही विविध प्रकल्प सुरू केले आहेत त्याची माहिती संकेत स्थळावर प्रसिध्द करावी, सभासद शेतकर्यांचा उस प्राधान्याने नेण्यात यावा या मागण्यांसाठी उस उत्पादक शेतकरी,सभासद हे दि.21 डिसेंबर सोमवार रोजी सकाळी 11.00 वाजता लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्यावर मोर्चा काढून गेट समोर धरणे आंदोलन करणार आहेत अशा आशयाचे लेखी निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब, बीड,उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांना दिले आहे तरी या धरणे आंदोलनात उस उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उस उत्पादक शेतकरी तथा मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे पाटील यांनी केले आहे.