$type=ticker$snippet=hide$cate=0

घाबरण्याची नाही, तर सावध राहण्याची गरज

  जगात कोरोनानं किती धुमाकूळ घातला, हे गेले वर्षभर आपण पाहिलं आहे. सात कोटींहून अधिक लोकांना लागण, लाखोंचा मृत्यू हे सारं अजून विस्मृतीत गेल...


  जगात कोरोनानं किती धुमाकूळ घातला, हे गेले वर्षभर आपण पाहिलं आहे. सात कोटींहून अधिक लोकांना लागण, लाखोंचा मृत्यू हे सारं अजून विस्मृतीत गेलेलं नाही. जगात यापूर्वी साथीचे अनेक रोग आले. त्यात कोटयवधी लोकांचा बळी गेला. कोरोनाचे बळी त्यापेक्षा कमी असतील; परंतु साथीच्या अन्य रोगांनी जगाच्या अर्थव्यवस्थेला कधीच हिसका दाखविला नव्हता. तो कोरोनानं दाखविला. त्यातच आता कोरोनाचा नवा विषाणू बरोबर एक वर्षानंतर आला आणि त्याचा प्रसार अधिक वेगानं होत असल्यानं जग चिंतीत आहे; मात्र अधिक घाबरून न जाता विवेकानं त्यावर मात केली पाहिजे.

बरोबर एक वर्षापूर्वी चीनमध्ये कोरोनाचा विषाणू सापडला. त्यानं जगभरात धुमाकूळ घातला. त्यानंतर वैज्ञानिक कामाला लागले. कोरोनाची लस शोधण्यात यश आलं. ब्रिटन, अमेरिका, चीन या देशांत कोरोनाचं लसीकरणही सुरू झालं. असं असलं, तरी गेल्या वर्षभरात कोरोनानं जगाच्या अर्थकारणात किती गोंधळ घातला, हे अनुभवाला आलं आहे. टाळेबंदी लागू करणं हा कोरोनावरचा उपाय नाही, तर मुखपट्टी, सामाजिक अंतर भान आणि वारंवार स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर करणं आवश्यक आहे. टाळेबंदीनं जगाच्या अर्थव्यवस्थेचे नऊ ट्रिलियन डॉलरचं नुकसान झालं. जपान आणि जर्मनी यांच्या एकत्रित अर्थव्यवस्थेएवढं हे नुकसान आहे. अजून जग त्यातून बाहेर पडलेलं नाही. त्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते. अगदी कोरोनाची लस आली, तरी त्यानं निर्धास्त होता येणार नाही. कोरोना झाल्यानंतर उपचारावर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी अगोदरच काळजी घेतली, तरी कोरोनाला आपण दो गज दुरीवर ठेवू शकतो. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नागरिक बिनधास्त झाले. समाजात वावरताना त्यांना कोरोनाविषयक उपाययोजनांचा विसर पडला. त्यातच आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळला आहे. पूर्वीच्या तुलनेत त्याचा प्रसाराचा वेग अधिक आहे. स्ट्रेन प्रकारच्या या विषाणूमुळं कोरोनाचा प्रसार वेगानं वाढत असला, तरी पूर्वीच्या तुलनेत नव्या विषाणूमुळं होणार्‍या मृत्यूची संख्या कमी आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रसार वेगानं सुरू झाल्यानंतर तिथं टाळेबंदी लागू करण्यात आली. महाराष्ट्राच लगेच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. केंद्र सरकारनं नियमावली जाहीर केली. पहिल्या चुकातून जग अजून काहीच बोध घ्यायला तयार नाही, हेच त्यातून दिसतं. न्यूझीलंड, तैवानसारख्या देशांनी ज्या पद्धतीनं कोरोनावर मात केली, त्याचा साधा अभ्यासही कुणी करायला तयार नाही. उलट ब्रिटनचं अनुकरण आता अन्य देशही करायला लागले आहेत. गेल्या वर्षी चीनमध्ये जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, तेव्हा जगातील बहुतांश देशांनी चीनमध्ये जाण्या-येण्यावर बंधनं घातली. आता ब्रिटनसह काही देशांत कोरोनाचं लसीकरण सुरू झालं असताना या स्ट्रेन विषाणूमुळं सर्वांची चिंता वाढली आहे. त्यामुळं जगातील बहुतांश देशांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. तशी ती घ्यायलाच हवी; परंतु त्यानं फार घाबरून जाण्याचंही काहीच कारण नाही. आता कुठं जगाची अर्थव्यवस्था सुधारायला लागली असताना पुन्हा टाळेबंदी लागू केल्यानं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

जगातील काही देशांमध्ये नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यास सुरुवात झालेली असताना, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन स्ट्रेन सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण जगामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना विषाणूचा जो मूळ प्रकार आहे, त्यापेक्षा या नव्या स्ट्रेनमुळं 70 टक्के अधिक संक्रमण होऊ शकतं, असं म्हटलं जातं. खबरदारी म्हणून अनेक देशांनी आधीच आपल्या सीमा बंद केल्या आहेत. हवाईमार्गे ब्रिटनवरुन होणारी प्रवासी वाहतूकही बंद केली आहे. कोरोना विषाणूमध्ये जे परिवर्तन होत आहे, त्यामुळं लस दिल्यानंतर प्रत्येकाच्या प्रतिसाद देण्यावर परिणाम होईल का, या प्रश्‍नावर शास्त्रज्ञांनी हे अशक्य असल्याचं उत्तर दिलं. मानवी शरीराला विषाणूची लागण झाल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल होत असतात. हे अनपेक्षित नाही आणि त्यामुळं चिंता करण्याचीही आवश्यकता नाही, असं शास्त्रज्ञ सांगतात. वेल्लोरच्या ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. गगनदीप कांग म्हणाले, की अनेक कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मिती अँटीबॉडीज निर्मितीच्या उद्देशानं करण्यात आली आहे. या अँटीबॉडीज कोरोना विषाणूमधील स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करतील. लस स्पाइकमधील वेगवेगळया भागांना लक्ष्य करते. त्यामुळं विषाणूमध्ये एखादं परिवर्तन झालं, म्हणून लस उपयोगी ठरणार नाही, असं म्हणता येणार नाही. लसीमध्ये अँटीबॉडीजसारखा काही पैलूंमध्ये फरक असू शकतो; पण म्हणून लस निष्क्रिय ठरेल, असा अर्थ काढू शकत नाही. विषाणूमध्ये परिवर्तन झालं, तरी लस तितकीच प्रभावी ठरू शकते. त्यामुळं चिंता करण्याची गरज नाही, असं सीएसआयआर महासंचालक डॉ. शेखर मांडे सांगतात. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या डॉ. विवेक मूर्ती यांची कोरोनाविषयक पथकात नियुक्ती केली. डॉ. विवेक मूर्ती  सर्जन जनरल या पदावर नियुक्त आहेत. त्यांनी, ब्रिटनमध्ये नव्यानं आढळून आलेला कोरोना विषाणू अधिक घातक नसावा, असं आत्तापर्यंतच्या लक्षणांवरून आढळून आलं आहे, असं म्हटलं आहे. डॉ. कांग, डॉ. मांडे यांच्या आणि डॉ. मूर्ती यांच्या म्हणण्यात एकवाक्यता आहे. जगातील अन्य शास्त्रज्ञही त्याच मताचे आहेत. त्यामुळं कोरोनाच्या नव्या प्रकारामुळं फार घाबरून जाण्याचं आणि चिंतीत व्हायचंही काहीच कारण नाही. सध्या विकसित करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लस या विषाणूंवर प्रभावी ठरणार नाहीत, असं म्हणायला कोणतंही कारण नाही. ब्रिटनमधून आलेल्या वृत्तानुसार, नव्यानं आढळून आलेला विषाणू अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळंच तो अधिक घातक आहे, असं म्हटलं जात आहे; मात्र तशा प्रकारचे कोणतेच पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असंही मूर्ती यांनी म्हटलं आहे. नवा विषाणू आढळल्याच्या वृत्तानंतर ब्रिटनमध्ये प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसंच वेगानं फैलाव होत असलेल्या या नव्या विषाणूच्या चिंतेमुळं विमानसेवाही रद्द करण्यात आल्या आहेत. हा नव्यानं आढळलेला विषाणू ब्रिटनमधल्याच एखाद्या रुग्णांमध्ये तयार झाला असावा किंवा ज्या ठिकाणी कोरोना विषाणूतील गुणसूत्रात्मक बदलांची दखल घेण्याची क्षमता नाही, अशा देशातून आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळंच मुखपट्टी, सुरक्षित वावर, हात धुणं यासारख्या नियमांचं पालन करत कोरोना संसर्गाला दूर ठेवायला हवं.

ब्रिटन सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पॅट्रीक व्हॅलेन्स यांनी सांगितलं, की हा विषाणूचा नवा प्रकार अतिशय वेगानं फैलावत आहे. लंडनमधील जवळपास 60 टक्क्यांहून अधिक कोरोनाबाधित हे नव्या प्रकाराच्या विषाणूमुळं झाले आहेत. या नव्या प्रकाराच्या विषाणूचे जवळपास दोन डझन म्युटेशन आहे. त्यातील काही स्पाइक प्रोटीन आहेत. त्याच्या आधारे विषाणू शरीरातील पेशींवर हल्ला करतो. सध्याच्या विकसित करण्यात आलेल्या लसीदेखील याच स्पाइकला लक्ष्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना लस घेणं सुरक्षित असल्याचं देशवासीयांना पटवून देण्यासाठी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन जाहीरपणे स्वत:ला लस टोचून घेतली आहे. 78 वर्षीय बायडेन यांचा समावेश कोरोनाच्या हायरिस्क ग्रुपमध्ये होतो. ‘मॉडर्ना’द्वारे विकसित करण्यात आलेली लस अमेरिकेत दाखल झाली असतानाच बायडेन यांनी लशीचा पहिला डोस घेतला. अमेरिकेस यापूर्वी फायझर कंपनीचीही लस प्राप्त झाली आहे. बायडेन यांना फायजर-बायोएनटेकची लस देण्यात आली. कोरोनानं आत्तापर्यंत तीन लाख 17 हजार अमेरिकींचे बळी घेतले आहेत. फायझर व मॉडर्ना या कंपन्यांच्या लसी उपलब्ध होत असूनही अमेरिकी नागरिकांमध्ये या लसीकरणाबाबत कमालीची साशंकता आहे. लसीकरणामुळं शरीरास अन्य अपाय होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. नवीन कोरोना विषाणूमुळे सध्या तयार करण्यात येत असलेल्या लसींवर कोणताही परिणाम होणार नाही. कोरोना विषाणूत कोणताही बदल झाला, तरी यावर लस प्रभावी ठरतील. चिंता करण्याची आणि घाबरून जाण्याचीही गरज नाही. नवीन कोरोना विषाणूचे कोणतेही संकेत आपल्या देशात आढळून आलेले नाहीत, असं  भारताच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. त्यामुळं सध्या तरी निर्धास्त राहण्याची त्याचबरोबर योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ब्रिटनमध्ये एकमेकांपासून संसर्ग अधिक होत आहे. तो एक सुपर स्प्रेडर बनत आहे; पण यामुळं रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका वाढलेला नाही. विषाणूत बदल होतात आणि बर्‍याच विषाणूचं स्वरूप असंच असतं, जे फार महत्वाचे नाही, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं.

Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10347,औरंगाबाद,365,क्रीडा,678,दखल,707,देश,4448,नाशिक,805,पुणे,746,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16479,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13722,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3721,विदेश,651,संपादकी,1,संपादकीय,1554,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: घाबरण्याची नाही, तर सावध राहण्याची गरज
घाबरण्याची नाही, तर सावध राहण्याची गरज
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_883.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_883.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content