माजलगाव । प्रतिनिधीः जुन्या वादातून दोन गट आमने सामने आले . वादाचे रुपांतर हाणामारीत झाले . यामध्ये तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ( दि...

माजलगाव । प्रतिनिधीः जुन्या वादातून दोन गट आमने सामने आले . वादाचे रुपांतर हाणामारीत झाले . यामध्ये तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ( दि .11 ) दुपारी माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे घडली . माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे शुक्रवारी दुपारी दोन गटात वाद झाला. दोन्ही गटातील लोक समोरासमोर आल्याने शाब्दीक चकमक होवुन काही वेळातच दोन्ही बाजुकडुन हाणमार सुरू झाली . सुंदर लक्ष्मण अवघडे , सर्जेराव लक्ष्मण अवघडे , विष्णु सुंदर अवघडे ,ज्ञानेश्वर सुंदर अवघडे या चौघांसह महिलांना मारहाण करण्यात आली आहे . हे सर्वजण जखमी झाले असून त्यांना तातडीने माजलगाव येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले . माजलगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे . सदरील घटना ही जुन्या वादातून घडली असल्याची माहिती आहे .