पारनेर/प्रतिनिधीः शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गेल्या अनेक दशकांपासून ओळख असलेल्या तालुक्यातील पठारवाडी ग्रामपंचायतीवर आता महाविकास आघाडचा...
पारनेर/प्रतिनिधीः शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गेल्या अनेक दशकांपासून ओळख असलेल्या तालुक्यातील पठारवाडी ग्रामपंचायतीवर आता महाविकास आघाडचा झेंडा फडकणार आहे.
केवळ राजकरणामुळे एकेकाळचे जिवलग मित्र असलेले एकमेकांपासून दूर गेले. तब्बल विस वर्षांच्या कालखंडानंतर दोघा मित्रांना एकत्र आणण्याचा करिश्मा आमदार नीलेश लंके यांनी केला असून आता पठारवाडीची ग्रामपंचायत बिनविरोध होउन ग्रामपंचायतीवर केवळ शिवसेनेचा नव्हे तर महाविकास अघाडीचा झेेंडा फडकणार आहे. दरम्यान पठारवाडीसोबत लोणीहवेली तसेच जातेगांव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकाही बिनविरोध करण्याचा निर्णय आ. लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. पठारवाडीत किसनराव सुपेकर हे शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते. त्यांच्याच नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणूकीत तेथे नेहमीच भगव्याची सरशी होत असे. कोणत्याही निवडणूकीत पठावाडीत शिवसेनेलाच आघाडी हे जणू समिकरणच होते. याच राजकरणातून कधी काळी एकमेकांचे मित्र असलेले किसनराव रासकर व हरिभाउ पवार हे एकमेकांची विरोधक झाले. यंदा आ. लंके यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींची घोषणा केली व त्यानिमित्ताने झालेल्या बैठकीत राजकरणामुळे एकमेकांचे राजकिय दुश्मन झालेेल्या सुपेकर व पवार यांचे मनोमिलन घडवून आणण्याचा करिश्मा आ. लंके यांनी करून दाखविला. एकमेकांमधील कटूता विसरून गावाच्या विकासासाठी आ. लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा दोघांनीही निर्णय घेतला. एकमेकांना पेढे भरवून सुपेकर व पवार यांनी कटूता दुर केली.