नागपूर : दिव्यांग व्यक्तीचे वैश्विक ओळखपत्र (णऊखऊ) स्मार्ट कार्ड आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास सवलत मिळण्यासा...
नागपूर : दिव्यांग व्यक्तीचे वैश्विक ओळखपत्र (णऊखऊ) स्मार्ट कार्ड आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास सवलत मिळण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होणार नाही.दिव्यांग व्यक्तीला वैश्विक स्तरावर लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनाने दिव्यांग जन सशक्तीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 (पीडब्ल्यूडी कायदा) संपूर्ण देशात लागू केला आहे. या अधिनियमात 21 प्रकारच्या दिव्यांगांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत दिव्यांग व्यक्तीचे वैश्विक ओळखपत्र ( णऊखऊ) स्मार्ट कार्डच्या रुपात प्रदान करण्यात येते. सद्यस्थितीत प्रवास सवलत मिळविण्यासाठी दिव्यांग व्यक्तीला जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्या कार्यालयाकडून दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे ओळखपत्र प्रदान करण्यात येत होते. या ओळखपत्रावर आगार व्यवस्थापकाची सही व शिक्का प्राप्त झाल्यानंतर दिव्यांग व्यक्ती तसेच सहप्रवासी यांना एस.टी.च्या भाड्यामध्ये सवलत मिळत होती. यासाठी दिव्यांग व्यक्तीला मोठ्या प्रमाणात अडचणी येते होत्या. आता यात सुधारणा करुन दिव्यांग प्रमाणपत्र देतांनाच हे ओळखपत्र तयार करुन त्यांना घरपोच पोहचविण्यात आल्यामुळे दिव्यांग व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र असल्यास प्रवास सवलत मिळण्यासाठी वेगळे ओळखपत्र काढू नये, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनिल वाळके यांनी केले आहे.