परळी वैजनाथ । प्रतिनिधीः- निवडणुकिच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधी निवडून देऊन मजबुत लोकशाही...
परळी वैजनाथ । प्रतिनिधीः-
निवडणुकिच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधी निवडून देऊन मजबुत लोकशाही निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोग वेळोवेळी मतदार याद्या तयार करुन नवनवीन मतदार शोधून नांव नोंदणी केली जाते.पन प्रियानगर परळी वैजनाथ येथे राहणारे,जाधव कुटुंबाचे नाव मतदारयादित अद्यापर्यंत झालेले नाही,त्यांची नावे मतदार यादीत घ्यावी अशी विनंती तहसीलदार परळी वैजनाथ यांच्याकडे अॅड.परमेश्चर गित्ते यांनी केली असता तहसीलदार परळी वैजनाथ यांनी तात्काळ दखल घेतली व मतदारयादित नाव दाखल करण्यासाठी अर्ज भरुन घेतले.
तहसिलदार डॉ विपिन पाटील यांचे सुचनेवरुन नायब तहसीलदार बी एल रुपनर, बीएलओ प्रकाशन लोखंडे यांनी प्रियानगर,परळी वैजनाथ,शहरात भाग क्र 161 येथील आजपर्यंत नावनोंदणी न केलेल्या जाधव कुटुंबाचा शोध घेऊन त्या कुटुंबातील 1)शेठबा खंडू जाधव वय 80,वर्षे,2)गजराबाई शेठबा जाधव-वय 70 वर्षे 3)सुनीता शेठबा जाधव-वय 50 वर्षे 4)शंकर शेठबा जाधव वय-32वर्षे या 4 ही व्यक्तीचां न.नं 6 चा अर्ज भरुन घेतला व या चारही लोकांचे मतदारयादीत नाव नसलेबाबत खात्री केली.जाधव कुटुंबात कुणीही शिकलेले नाही त्यांच्या कडे रहिवासा बाबत कोणताही पुरावा नाही आधारकार्ड, पॅनकार्ड,मतदान कार्ड,रेषनकार्ड,लाईट बील, इत्यादी कोताही पुरावा नाही.जाधव कुटुंबाला रेषनचे अन्नधान्य मिळत नाही, वृद्धपकाळ पेन्शन मिळत नाही,दारिद्र्य रेषेखालील नाव नाही,स्वताचे घर,जागा नाही,गरीब कुटुंब असुन सर्व शासन योजने पासून वंचित असलेले जाधव कुटुंब आहे.या जाधव कुटुंबाची समस्या अॅड परमेश्वर गित्ते यांना समजताच अॅड परमेश्वर गित्ते यांनी परळी वैजनाथ चे तहसीलदार डॉ विपीन पाटील यांना माहिती दिली, तहसीलदार डॉ विपीन पाटील यांनी नायब तहसीलदार बी एल रुपनर रुपनर व बीएलओ,प्रकाश लोखंडे भाग क्र 161यांनी घरी जाऊनप्रत्यक्ष भेट घेऊन 6 नं चे फॉर्म भरून घेतले आहेत.व जाधव कुटुंबाचे नाव मतदारयादित घेण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार परळी वैजनाथ व नायब तहसीलदार परळी वैजनाथ यांनी दिले आहे.असी माहिती अॅड परमेश्वर गित्ते यांनी दिली आहे. सोबत जाधव कुटुंबाचे नाव नोंदणी अर्ज घेतानाचा फोटो आहे.