नेवासे/प्रतिनिधीः मुंबई येथे होणार्या हिवाळी अधिवेशनात मुस्लीम समाजासाठी दहा टक्के आरक्षण मंजूर करा अशी मागणी नेवासा येथील मुस्लीम समाजाचे ...
नेवासे/प्रतिनिधीः मुंबई येथे होणार्या हिवाळी अधिवेशनात मुस्लीम समाजासाठी दहा टक्के आरक्षण मंजूर करा अशी मागणी नेवासा येथील मुस्लीम समाजाचे इम्रानभाई दारुवाले यांनी तहसीलदार रुपेश सुराणा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. महाराष्ट्रात मुस्लीम समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आणि आर्थिक स्थिती पाहता समाजास संवैधानिक कायदा करून दहा टक्के आरक्षण देण्यात यावे, मुस्लिम आरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे, 2020 पासून पुढे होणार्या सर्व नोकरी मध्ये 10 टक्के जागा मुस्लीम समाजाला सोडण्यात यावे, मुस्लिमांवर होणारे हल्ले,मॉबलिंचीगच्या अपशब्द यांना आळा घालण्यासाठी मुस्लीम समाजाला अॅट्रासिटी कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या असून 14 ते 15 डिसेंबर ला होणार्या हिवाळी अधिवेशनात या मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा योग्य न्याय न मिळाल्यास समाज रस्त्यावर उतरेल असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.