$type=ticker$snippet=hide$cate=0

पश्‍चिम बंगालमधील झुंडशाही

    पश्‍चिम बंगालमधील सत्तासुंदरीनं आपल्याच गळ्यात माळ घालावी, यासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांत जे चालू आहे, त्याला ...

 



 पश्‍चिम बंगालमधील सत्तासुंदरीनं आपल्याच गळ्यात माळ घालावी, यासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांत जे चालू आहे, त्याला झुंडशाहीशिवाय दुसरा कोणताही शब्द नाही. चार महिन्यांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगाल ही रणभूमी बनली आहे. तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांच्या कार्यपद्धतीत फारसा फरक नाही. भाजप आणि तृणमूल काँग्रेस जशास तसं उत्तर देण्याची एकही संधी सोडत नसल्यानं पश्‍चिम बंगालला युद्घभूमीचं स्वरुप आलं आहे.


मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाची 35 वर्षांची राजवट उलथवून टाकण्यात तृणमूल काँग्रेसला यश आलं. त्याचं कारण 35 वर्षांत तिथं विरोधी पक्षाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यात काँग्रेस अपयशी ठरली होती. गेल्या दहा वर्षांत तृणमूल काँग्रेसनं पश्‍चिम बंगालचा कारभार पाहिला. त्या काळात डावे आणि काँग्रेसची शक्ती आणखी क्षीण होत गेली. सत्ताधारी चुकत असतील, तर त्याला वठणीवर आणण्यासाठी सक्षम पर्याय द्यावा लागतो. लोक अशा पर्यायाच्या शोधात असतात. असा पर्याय दिला नाही, की सत्ताधारी पक्ष एकाधिकारशाहीनं वागू लागतो. केंद्रात भाजप तसं वागतो, तर पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस. गेल्या सहा वर्षांपासून भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये पराकोटीचा संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष सत्तेसाठी हे उघड आहे. पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका आणखी चार-पाच महिन्यांनी होत आहे. या निवडणुकीत दोनशे जागा जिंकण्याच्या इर्षेनं भाजप मैदानात उतरला आहे. भाजपनं पश्‍चिम बंगालची सत्ता ममता दीदींच्या हातून हिसकावून घेण्याचा चंग बांधला आहे. गेल्या तीन-चार वर्षांत भाजपनं विरोधकांची पोकळी भरून काढली. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं 19 जागा जिंकून ममता दीदींना सक्षम पर्याय निर्माण केला आहे. भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी तिथं पक्ष संघटनेला दिशा दिली. उत्तम व्यूहरचना केली. भाजपनं केंद्रातून ताकद दिली. तपास यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावलं. एकीकडं डावे आणि काँग्रेस पश्‍चिम बंगालमध्ये कमकुवत होत असताना त्याचा फायदा भाजपनं घेतला आणि ती संधी भाजपला तृणमूल काँग्रेसनं उपलब्ध करून दिली. डाव्यांच्या काळात जशी झुंडशाही चालत होती, तशीच झुंडशाही आता तृणमूल काँग्रेसच्या काळात चालू आहे. गेल्या काही वर्षांत भाजपच्या 123 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची हत्या होणं हे गैरच. तृणमूल काँग्रेसनं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आताही भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळं केंद्र सरकार विरुद्ध पश्‍चिम बंगालच्या राज्य सरकारमध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे. तृणमूल काँग्रेसनं ही भाजपची नौटंकी असल्याचा आरोप करून हा हल्लाच पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. भाजपही हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप करतो. या हल्ल्यात विजयवर्गीय जखमी झाल्याचं सांगितलं गेलं. महाराष्ट्राचे राज्यपाल जसे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं वागतात, तसंच पश्‍चिम बंगालचे राज्यपाल वागत आहेत. राज्यपालानं कृती करायची असते. राज्य सरकारच्या कामगिरीबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल केंद्र सरकारला पाठवायचा असतो; परंतु तेथील राज्यपाल भाजपचे प्रवक्ते असल्याप्रमाणं आरोप करीत सुटले आहेत. ममता दीदींवर टीका करीत आहेत.

पश्‍चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळण्यास जितकी तृणमूल काँग्रेस जबाबदार आहे, तेवढाच भाजपही जबाबदार आहे. त्याचं कारण भाजपनं त्या राज्यात सुरू केलेलं विभाजनवादी आणि मतांच्या ध्रुवीकरणाचं राजकारण. विकासाच्या मुद्याऐवजी भावनिक मुद्द्यांचं राजकारण केलं जात आहे. भाजप आणि तृणमूल हे दोन्ही पक्ष आप-आपल्या मतपेढ्या मजबूत करण्याच्या नावाखाली कोणत्याही थराला जायला लागलं आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आगलावू भाषणं, परस्परांचा टोकाचा द्वेष करणारी विधानं पाहिली, तर पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय विद्वेष आणि त्यातून कार्यकर्त्यांच्या हत्या होतात. हे कुठंतरी थांबवायला हवं; परंतु निवडणुकीच्या मैदानात उतरलेले योद्ध्यांसारखे नेते परस्परांना संपवायला निघाले आहेत. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर काही तासांनीच शाह यांनी राज्यपालांकडून स्टेटस रिपोर्ट मागविला. त्यांनी प्रायोजित हिंसा असं हल्ल्याचं वर्णन केलं. या हल्ल्यात काही नेत्यांना दुखापत झाली आहे आणि ताफ्यातील वाहनांचं नुकसान झालं आहे. ताफ्यावरील हल्ल्यासाठी गृह मंत्रालयानं पश्‍चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना दिल्लीला बोलावलं. हा हल्ला गांभीर्याने घ्यावा, असाच आहे. त्याचा अहवाल राज्यपालांनी पाठविला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांकडून तसंच पोलिस महासंचालकांकडूनही अहवाल मागवता आला असता; परंतु त्यांना दिल्लीला बोलावण्याचं कारण काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. या दोन अधिकार्‍यांवर राज्य सरकारचं नियंत्रण आहे. राज्याच्या अधिकारावर हे केंद्र सरकारचं अतिक्रमण आहे. ममता दीदी भाजपच्या प्रत्येक कृतीला जशास तसं उत्तर देत असतात. राज्य सरकारनं या अधिकार्‍यांना दिल्लीला पाठविणार नसल्याचं सांगितलं. नड्डा यांच्या वाहनांवरील हल्ल्याच्या घटनेची केंद्रन सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली, हे चांगलंच आहे; परंतु देशात त्याहून मोठ्या कितीतरी मोठ्या घटना घडतात, त्याची दखल केंद्र सरकार घेतं का, हा प्रश्‍न अनुत्तरीत राहतो. या घटनेच्या बाबतीत गृह मंत्रालयानं पश्‍चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना 14 डिसेंबर रोजी समन्स बजावलं आहे. भाजप या घटनेसाठी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना दोष देत आहे. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर काही तासांनीच शाह यांनी राज्यपालांकडून परिस्थितीचा संपूर्ण अहवाल मागविला. या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला असून, कारच्या विंडस्क्रीनवर दगडफेक केली. एक चित्रही समोर आलं आहे, ज्यात कारच्या सीटवर एक मोठा दगड पडलेला आहे आणि काच तुटलेली आहे; परंतु पश्‍चिम बंगाल सरकार असं वातावरण तयार करीत आहे, की हा हल्ला भाजपचाच पूर्वनियोजित कट आहे. आता इतर विरोधी पक्ष गप्प का आहेत? राज्यपालांनी पाठविलेला अहवाल शुक्रवारी केंद्राला प्राप्त झाला.

पश्‍चिम बंगालच्या दोन दिवसांच्या नड्डा यांच्या दौर्‍यातील बाबत केंद्रीय गृह मंत्रालयानं सुरक्षेतील गंभीर त्रुटींबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागविला होता; परंतु राज्यानं अद्याप याबाबत अहवाल दिला नाही. राज्यपालांनी पश्‍चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्था आणि राजकीय हिंसाचार व अन्य गुन्ह्यांबाबत राज्य सरकारची भूमिका याबाबत सविस्तर अहवाल दिल्याचं समजते. काल घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, ती आमच्या लोकशाहीच्या वस्त्रावर डाग आहेत. राज्यपालांनी सीएम. मॅडम हा भारत आहे. भारताचे आत्मा आणि नागरिकत्व एक आहे. कोण येथील आणि कोण बाहेरील हा धोकादायक खेळ. आपण राज्यघटने अंतर्गत काम करण्याची शपथ घेतली आहे. राज्य सरकारचं वर्तन राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखं आहे, असा थेट हल्ला चढविला आहे. निवडणुकीला चार महिने राहिले असताना पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली, तर ते ममता दीदींच्या पथ्थ्यावर पडणारं आहे, त्यामुळं ती लागू होण्याची शक्यता नाही. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नड्डांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला जात असतानाच ममता यांनी भाजपच्या नेत्यांकडं आणि कार्यकर्त्यांकडं काही काम नसल्याचा टोला लगावला आहे. त्यांना दुसरी काही कामं नाहीत. कधी इथं केंद्रीय गृहमंत्री येतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा. जेव्हा त्यांच्याकडं कोणी प्रेक्षक नसतात, तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नौटंकी करण्यासाठी बोलवतात, असंही ममता म्हणाल्या. नड्डा यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या आणि त्यामागं जाणार्‍या प्रसारमाध्यमांच्या गाड्यांबद्दलही ममता यांनी शंका उपस्थित केली. तुमच्या नेत्यांचं इथं स्वागत आहे; मात्र आम्ही हिंसेला विरोध करतो, असं ममता यांनी म्हटलं आहे. तुमच्या ताफ्यामागं 50 गाड्या का होत्या? बाईक आणि प्रसारमाध्यमांच्या गाड्या का होता? तिथं कोण उभं होतं? दगड कोणी फेकले? ते सर्व नियोजित होतं का? असे प्रश्‍न उपस्थित करून तुम्ही खूप हुशार आहात, असं ममता यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं आहे. मी दिल्लीला जाते तेव्हा काय होतं? मी दिल्लीत डेरेक (डेरेक ओ ब्रायन तृणमूलचे खासदार आहेत) यांच्या घरी राहते. दरवेळी मी तिथं गेल्यावर भाजपचे कार्यकर्ते त्या घराला घेरतात, असा आरोप त्यांनी केला. सर्व केंद्रीय यंत्रणा हाताशी असताना भाजपला स्वत:च्या पक्षाध्यक्षांचं संरक्षण करता येत नाही याबद्दल आश्‍चर्य वाटत असल्याचं ममता यांनी म्हटलं आहे. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा नियोजित असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. 

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5550,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,3,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9981,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,661,देश,4153,नाशिक,776,पुणे,596,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15379,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12478,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3446,विदेश,637,संपादकीय,1467,सातारा,3157,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पश्‍चिम बंगालमधील झुंडशाही
पश्‍चिम बंगालमधील झुंडशाही
https://lh3.googleusercontent.com/-fjHy8KzK6Zs/X9TJd_w148I/AAAAAAABmCQ/oHBs31l6VAYiZJpXLg2lUkUsz-G6KYeUQCLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-fjHy8KzK6Zs/X9TJd_w148I/AAAAAAABmCQ/oHBs31l6VAYiZJpXLg2lUkUsz-G6KYeUQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_910.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_910.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content