$type=ticker$snippet=hide$cate=0

महसूल यंत्रणा बळकटी करणासाठी प्रयत्न : अब्दुल सत्तार

  मुंबई : मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता पाहता त्या प्रमाणात महसूल विभागाची यंत्रणा कमी आहे. तरीही महसूल वसुलीचे प्रम...

 


मुंबई : मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता पाहता त्या प्रमाणात महसूल विभागाची यंत्रणा कमी आहे. तरीही महसूल वसुलीचे प्रमाण समाधानकारक आहे. महसूल यंत्रणा बळकट करण्याचे आश्‍वासन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच घेतलेल्या प्रशासनिक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी उपस्थित होते. 

मुंबई शहरातील वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा  झाली. शासनाच्या या धोरणामुळे महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या कामासाठी महसूल अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संख्या पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई जिल्ह्यात एक उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि दोन तहसील कार्यालयाची लवकरच स्थापना करण्याच्या प्रस्तावाला गती देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे मुंबई जिल्ह्यातील नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत होणार असल्याचे राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले. तसेच मुंबई शहरात प्रभाग आणि वॉर्ड पातळीवर तलाठ्यांची गरज आहे. त्यामुळे लवकरच तलाठी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासनस्तरावर गती देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईतील श्रद्द्धास्थान असलेल्या बाबा हाजीअली दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सर्वधर्माच्या भाविकांना सोयी, सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या विशेष निधी देण्यात आला आहे. त्यामुळे बाबा हाजीअली दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.


ईव्हीएमसाठी गोडाऊनची निर्मिती 

निवडणुकीनंतर ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई शहरात लवकरच गोडाऊनची निर्मितीसाठी भारत निवडणूक आयोगाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे. या गोडाऊनसाठी मुंबई शहरात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10358,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,709,देश,4453,नाशिक,805,पुणे,750,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16506,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13749,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3728,विदेश,652,संपादकी,1,संपादकीय,1557,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: महसूल यंत्रणा बळकटी करणासाठी प्रयत्न : अब्दुल सत्तार
महसूल यंत्रणा बळकटी करणासाठी प्रयत्न : अब्दुल सत्तार
https://www.jagranimages.com/images/newimg/04012020/04_01_2020-abdul_sattar_ma_19905170_115234173.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_911.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_911.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content