$type=ticker$snippet=hide$cate=0

विखे पाटील हॉस्पिटलमधील लॅबवर गुन्हा

  कोरोनाचा खोटा अहवाल देऊन फसवणूक; अधिकारी, तंत्रज्ञ सामील अहमदनगर/प्रतिनिधी: कोरोना झाल्याचा खोटा अहवाल दिल्याप्रकरणी विळदघाट येथील पद्मश्र...

 कोरोनाचा खोटा अहवाल देऊन फसवणूक; अधिकारी, तंत्रज्ञ सामील

अहमदनगर/प्रतिनिधी: कोरोना झाल्याचा खोटा अहवाल दिल्याप्रकरणी विळदघाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमधील क्रस्ना डिग्नोस्टिकस प्रा. लि. लॅबचे प्रभारी अधिकारी, लॅब टेक्निशिन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट 2020 ते 11 नोव्हेंबर 2020 या काळात घडला आहे.

येथील बांधकाम


व्यावसायिक अशोक खोकराळे यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील बबनराव नारायण खोकराळे (वय 79) यांचे दोन बनावट व खोटे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार करून फिर्यादीची व त्यांच्या कुटुंबाची फसवणूक केली, असे या तक्रारीत म्हटले आहे. बबनराव यांना 13 ऑगस्ट रोजी घशात खवखव होत असल्याने हॉटेल पतियाळा हाऊस कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. तेथून त्यांना परस्पर न्युक्लिअस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 16 ऑगस्ट रोजी त्यांना कोरोना झाल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले. त्यानंतर 18 ऑगस्टला त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. 19 ऑगस्टला अमरधाममध्ये अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर खोकराळे यांनी उपचारांची कागदपत्रे काही तज्ज्ञांना दाखवली असता रिपोर्टबाबत शंका उपस्थित झाली. त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने या प्रकरणाची चौकशी केली. उपचार करणार्‍या डॉक्टरांना बबनराव खोकराळे यांचा कोरोना तपासणी अहवाल दाखवण्यास सांगितले; मात्र संबंधित हॉस्पिटलने तो नंतर सादर करू, असे सांगितल्याने खोकराळे यांचा संशय बळावला. त्यांनी शहरातील सर्व सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन बबनराव यांच्या कोरोना अहवालाबाबत चौकशी केली. तेथे कोठेही असा अहवाल दिला गेला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर विळद घाटातील डॉ. विखे मेमोरियल हॉस्पिटलमधील क्रस्ना डिग्नोस्टिक लॅबमध्ये चौकशी केली असता तेथे बबनराव खोकराळे यांची सलग दोन दिवस आरटीपीसीआर चाचणी केल्याचे अहवाल मिळाले. त्यावरील फोन नंबरवर चौकशी केली असता ते दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे नंबर होते. ते त्या व्यक्तींचेच रिपोर्ट होते. त्या रिपोर्टनुसार त्यांनी कोरोना उपचारही घेतल्याचे समजले. त्यावरून बबनराव खोकराळे यांचे ते रिपोर्ट नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे क्रस्ना डिग्नोस्टिक लॅबचे अधिकारी, लॅब टेक्निशियन व कर्मचार्‍यांविरुद्ध त्यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5568,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,13,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10022,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,666,देश,4190,नाशिक,779,पुणे,616,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,863,ब्रेकिंग,15494,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12600,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3467,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3167,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: विखे पाटील हॉस्पिटलमधील लॅबवर गुन्हा
विखे पाटील हॉस्पिटलमधील लॅबवर गुन्हा
https://1.bp.blogspot.com/-CgtFlfr6Y64/X-yN6JtQcPI/AAAAAAABmMs/XLrNIk-0jwoAly19e3xNEQRre1CM26l9gCLcBGAsYHQ/s320/padmashree-dr-vitthalrao-vikhe-patil-memorial-hospital-ahmednagar-ho-ahmednagar-hospitals-bljpr0n.jpg
https://1.bp.blogspot.com/-CgtFlfr6Y64/X-yN6JtQcPI/AAAAAAABmMs/XLrNIk-0jwoAly19e3xNEQRre1CM26l9gCLcBGAsYHQ/s72-c/padmashree-dr-vitthalrao-vikhe-patil-memorial-hospital-ahmednagar-ho-ahmednagar-hospitals-bljpr0n.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_9130.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_9130.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content