$type=ticker$snippet=hide$cate=0

शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करुन घ्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांचे निर्देश

  पुणे :  शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात.  पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे व ऑनलाई...

 



पुणे :

 शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात.  पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा. ज्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा द्यावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी केले.

राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर 17 चालतो तसा तो सीबीएसई, आईसीएससी शाळांबाबत चालेल का याबाबत शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना देखील डॉ.गोर्‍हे यांनी शिक्षण विभागास केली. ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात डॉ.नीलम गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पालक आणि संस्थाचालक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक सोडियम हायपो क्लोराईड खरेदी करावे व त्याचे मिश्रण फवारावे. मान्यता नसलेल्या शाळा सुरू असल्याबाबत पिंपरी चिंचवड येथील पालकांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावर डॉ गोर्‍हे यांनी मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणे हा गंभीर गुन्हा असून याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करावा व शिक्षण विभागाला कळवावे. शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश दिले. मुले, शिक्षक व पालक यांचे मानसिक आरोग्य सर्वानी जपावे. शाळांनी तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर, ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी ऑक्सिमिटर घ्यावे, असे निर्देश दिले. ज्या शाळांनी शासनाच्या सूचना डावलून फी वाढ केली आहे तेथील पालकांनी शिक्षण विभागास कळवावे. शाळांनी कोरोना काळात फी वाढ करु नये याबाबत उच्च न्यायालयातील चाललेल्या दाव्यात राज्य सरकारने या महागड्या इंग्रजी शाळांची उदाहरणे वापरता येतील का, हे तपासून घ्यावे, असेही उपसभापतींनी शिक्षणविषयक सचिवांना सुचविले. 

शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा यांनी 10 नोव्हेंबर 2020 चे शिक्षण विभागाचे परिपत्रक स्पष्ट असल्याने आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे सांगितले. ज्या मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळाले नाही तरीही त्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी फॉर्म नंबर 17 भरून द्यावा व परीक्षा द्यावी असे सांगितले. सर्व मुलांना वापरता येईल अशी ऑनलाईन लिंक व परीपत्रकेही त्यांनी दिली. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व शाळा सुरु करण्यासंदर्भात कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. सक्रिय रुग्ण राज्यात फक्त 6 जिल्ह्यात आहेत व त्यांची संख्याही खूपच कमी आहे. तसेच पालक,शिक्षक यांनी काही नियमावली पाळणे गरजेचे आहे असे सांगितले. 


Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5770,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,202,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,39,satara,147,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10335,औरंगाबाद,365,क्रीडा,678,दखल,706,देश,4439,नाशिक,805,पुणे,742,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16437,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13679,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3707,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1552,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करुन घ्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांचे निर्देश
शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करुन घ्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांचे निर्देश
https://pbs.twimg.com/profile_images/1331302404323610624/1osGR2SY_400x400.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_914.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_914.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content