नेवासा/प्रतिनिधी ः अहमदनगर येथील निर्मलनगर येथील ठोकळ कुटूंबियांवर झालेल्या भ्याड हल्याचा काँग्रेसच्या अनुसूचित विभागाच्या वतीने निषेध करण्य...

नेवासा/प्रतिनिधी ः अहमदनगर येथील निर्मलनगर येथील ठोकळ कुटूंबियांवर झालेल्या भ्याड हल्याचा काँग्रेसच्या अनुसूचित विभागाच्या वतीने निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने निवेदन देण्यात आले. भ्याड हल्ला करणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी यावेळी निवेदनात केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देतेवेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, शहर जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, समितीचे महाराष्ट्र समन्वयक नामदेव चांदणे, केडगाव शहर अध्यक्ष अमित भांड, विलास आल्हाट, प्रशांत भिंगारदिवे, नगर शहर संघटक अनुसूचित विभाग उपशहराध्यक्ष तुषार जगताप, पिडीत ठोकळ कुटुबांतील सदस्य व काँग्रेस अनुसूचित जाती विभागातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.