येणार नवीन रशियन जीपीएस प्रणाली बँक खात्यातून वजा होणार टोलची रक्कम केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची माहिती मुंबई - टोल नाक्यांसंदर्भात कें...
येणार नवीन रशियन जीपीएस प्रणाली
बँक खात्यातून वजा होणार टोलची रक्कम
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची माहिती
मुंबई -टोल नाक्यांसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही खुशखबर दिली आहे. येत्या दोन वर्षांत भारतातून टोलनाके हद्दपार होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) प्रणाली सरकार आणणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
फास्टटॅगच्या धर्तीवर देशात येणार नवी रशियन जीपीएस प्रणाली
नव्या प्रणालीमुळे टोल तुमच्या बँकेतून वजा होणार आहे. रशियन सरकारसोबत याबाबत काम सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे 2 वर्षांत भारत टोलमुक्त होईल. सर्व जुन्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टम बसवण्यात येणार आहे. याआधीच टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. ज्यामुळे इंधन बचत आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
थेट खात्यातून होणार टोलची वसूली
फास्टॅगचा वापर झपाट्याने वाढत आहे. नितीन गडकरी यांनी म्हटलं की, “टोल वसुलीसाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून एक सादरीकरण देण्यात आले. येत्या पाच वर्षांत टोलचे उत्पन्न १,३४,००० कोटी होण्याची अपेक्षा आहे.’ नव्या तंत्रज्ञानामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल असेही गडकरी यांनी म्हटले आहे.