$type=ticker$snippet=hide$cate=0

तुमचा कारशेडला, तर आमचा वाढवण बंदराला विरोध

मोदी -ठाकरे सरकार आमने-सामने; बुलेट ट्रेनही होऊ देणार नाही मुंबई / प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने ...



मोदी -ठाकरे सरकार आमने-सामने; बुलेट ट्रेनही होऊ देणार नाही

मुंबई / प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने केंद्रातील मोदी सरकारला जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. केंद्राकडून कांजूरमार्ग कारशेडच्या जमिनीवर दावा केल्यानंतर आता ठाकरे सरकारने केंद्राच्या महत्त्वकांक्षी योजनांना पाचर ठोकली आहे. बुलेट ट्रेन आणि वाढवण बंदराला स्थानिक जनतेचा विरोध आहे, असे म्हणत सरकारने त्याविरोधात भूमिका घेतली आहे.

हे प्रकल्प जनतेला मारक असल्याची भूमिका घेत शिवसेनेकडून विरोध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेनला विरोध करणार्‍या आंदोलकांच्या समितीची भेट घेतली. तसेच जर या प्रकल्पांना स्थानिक जनतेचा विरोध असेल तर आपलाही विरोध असेल, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे मोदी आणि ठाकरे सरकार आमने सामने आले आहे. वाढवण बंदर, बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प आदिवासींवर मारक ठरत आहे. त्याला आदिवासींचा विरोध आहे. वाढवण बंदरामुळे पश्‍चिम किनारपट्टी धोक्यात येणार आहे. मच्छीमारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री यावर योग्य तो निर्णय घेतील. आमची आजची बैठक सकारात्मक झाली, अशी माहिती मच्छीमार नेते किरण कोळी यांनी दिली.

वाढवण बंदराच्या मुद्द्यावर बोलताना शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की राज्य सरकारने कालच (17 डिसेंबर) बीकेसी येथील बुलेट ट्रेनच्या जागेची मेट्रो कारशेडसाठी पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनला भूसंपादन केलेल्या स्थानिक रहिवाशांकडून विरोध होतो आहे. कांजूरमार्ग येथील प्रस्तावित जागेला न्यायालयाकडून स्थगिती आली आहे. हे प्रकरण न्यायालयात किती वेळ चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रकल्पाचे नुकसान होऊ नये आणि प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी बीकेसीचा पर्याय पुढे आला आहे.

शिवसेना खासदार राजेंद्र गावित म्हणाले, की वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन यासंदर्भात स्थानिक जनतेचा विरोध आहे. हे दोन्ही प्रकल्प इथल्या जनतेला मारक आहेत. त्यामुळे रद्द झाले पाहिजेत. बुलेट ट्रेनची जागा हस्तांतरण करण्यासंदर्भात जबरदस्ती होती, ती थांबली पाहिजे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


वाढवण बंदराला तत्वता मंजुरी

डहाणू तालुक्यातील प्रस्तावित वाढवण बंदराला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तत्वतः मंजुरी देत हिरवा कंदील दाखवला. मोदी सरकारकडून बुधवारी 65 हजार 545 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती. वाढवण बंदर ‘लँडलॉर्ड मॉडेल’च्या धर्तीवर विकसित केले जाईल. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सह 50 टक्के किंवा त्याहून अधिक भागीदारीसह प्रमुख भागीदार म्हणून स्वतंत्र कंपनीची (स्पेशल पर्पज व्हेईकल-एसपीव्ही) स्थापना केली जाईल.

 

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5554,letest News,585,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,315,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9990,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,663,देश,4157,नाशिक,776,पुणे,599,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15394,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12494,महाराष्ट्र सातारा,27,मुंबई,3446,विदेश,637,संपादकीय,1469,सातारा,3159,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: तुमचा कारशेडला, तर आमचा वाढवण बंदराला विरोध
तुमचा कारशेडला, तर आमचा वाढवण बंदराला विरोध
https://d282wbz2keffpz.cloudfront.net/wp-content/uploads/2020/12/19000426/Uddhav-Thackeray_Bullet-Train_Narendra-Modi-.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_925.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_925.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content