नाशिक/प्रतिनिधी नाशिक महानगरातील बाहुबली नगरसेवकांसमोर महापालिका प्रशासनाने सपशेल नांगी टाकून शरणागती पत्करल्याचा आरोप नागरीकांकडून केला जात...
नाशिक/प्रतिनिधी
नाशिक महानगरातील बाहुबली नगरसेवकांसमोर महापालिका प्रशासनाने सपशेल नांगी टाकून शरणागती पत्करल्याचा आरोप नागरीकांकडून केला जात आहे.शहरात ठिकठिकाणी असलेले अतिक्रमण आणि शहर विद्रूपीकरणास कारणीभूत असलेले होर्डींग काढतांना मनपा प्रशासन सापत्न भावाचा अवलंब करीत असल्याचा आरोप होत असतानाच सातपुर मधील प्रभाग नऊच्या नगरसेवकाच्या निवास स्थानाकडे जाणारा रस्ता दाखवणारा दिशा दर्शक फलक चर्चेत आला आहे.
या संदर्भात छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर यांनी मनपाच्या आॕनलाईन पोर्टलवर तक्रारही दाखल केली असून प्रशासनाला कारवाई करण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात करण गायकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,
नगरसेवक यांच्या घराकडे जाणारा मार्ग दाखवणारा दिशादर्शक बोर्ड एवढ्या मोठ्या आकारात लावता येतो का? तो लावता येत असेल तर मग प्रत्येक नगरसेवकाच्या घराकडे अशा मोठ्या आकारातील बोर्ड लावायला हवा.एरवी रस्त्यावर रहदारीला कुठलाही अडथळा येत नसातानाही पोट भरणाऱ्या व्यवसायिकांना रस्त्यावरून हुसाकावणारी महापालिका या नगरसेवकावर एव्हढी मेहेरबान का झाली?नगरसेवकाच्या दादागीरीला प्रशासकीय अधिकारी घाबरतात का? नियम भंग करून अशा पध्दतीने अतिक्रमण करणे महापालिका अधिनियमात बसते का? अशा लोकप्रतिनिधींवर निलंबनाची कारवाई करण्याचे धाडस मनपा प्रशासन दाखवेल का?असे सवाल करून फलक काढण्याची मागणी करण गायकर यांनी केली आहे.
"प्रभाग ९ मधील हा दिशादर्शक फलक काढण्याची हिम्मत मनपा अधिकारी का दाखवीत नाहीत.सामान्य माणसाला जो न्याय दिला जातो त्यात नगरसेवकाला विशेष बाब म्हणून सवलत देण्याची तरतुद मनपा अधिनियमात आहे.माझी तक्रार विचारात घेऊन तात्काळ कारवाई न केल्यास छावा क्रांती सेना तिव्र आंदोलन छेडेल.
-करण गायकर
सातपुर नाशिक