अकोले/प्रतिनिधी : अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडुन आर्थिक बाबीशी संबंधित कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात असलयाची तक्रार बाळासाहेब जयराम द...
अकोले/प्रतिनिधी : अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडुन आर्थिक बाबीशी संबंधित कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात असलयाची तक्रार बाळासाहेब जयराम देशमुख यांनी केली आहे. आम्ही उत्पादक सभासद म्हणून कारखाण्याकडे कारखाण्याकडील कर्ज, ताळेबंद, नफा तोटा पत्रक या कागद पत्रांची मागणी केली असता, कारखाना प्रशासनाकडुन कागदोपत्री माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब देशमुख, शेतकरी नेते दशरथ सावंत, मारुती भांगरे यांनी केला आहे.
यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की आम्ही उत्पादक सभासद असुन आम्ही ताळेबंद,नफा तोटा पत्रक,विविध कर्जा सबंधीची माहीती द्यावी. यासाठी कार्यकारी संचालक यांच्याकडे दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी समक्ष मागणी केली होती. आठ दिवसात माहीती उपल्बध करुन द्यावी अशी विनंती केली होती. परंतु वारंवार पाठपुरावा करुन ही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सभासद यांना सदर माहीती देणे कायद्याने बंधनकारक असताना माहीती न दिल्याने १० डिसेंबर २०२० पासुन माहिती उपल्बध होईपर्यत कार्यकारी संचालक यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
माहिती न देण्याचा उद्देश नाही.
सभासदांनी माहिती मागणे हा त्यांचा अधिकार आहे मात्र कोरोना कालावधी असल्याने देण्यास विलंब होत आहे. संचालक मंडळतील उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर तसेच काही संचालक पॉझिटिव्ह आल्याने संचालक मीटिंग झाली नाही संचालक मंडळाची मान्यता घेऊन त्यांना माहिती देण्यात येईल. टाळाटाळ करण्याचा आमचा प्रयत्न नाही असे भास्कर घुले यांनी दैनिक लोकमंथनला सांगितले.
भास्कर घुले (कार्यकारी संचालक अगस्ती कारखाना)